Wardha News: मोठी बातमी! खोदकाम सुरू असताना विहिर खचली, दोन मजुरांची मृत्यूशी झूंज सुरू; बचावकार्याला सुरूवात

या घटनेत दोन मजुरांची मजुरांची मृत्यूशी झूंज सुरू असून तीन जेसीबीच्या सहाय्याने विहिरीतील मलबा उपसण्याचे काम सुरु आहे.....
Wardha News
Wardha NewsSaamtv
Published On: 

चेतन व्यास..

Wardha News: वर्ध्यामधील गौळ शिवारातील वरभे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरु असतानाच ५० फूट खोल विहिर खचल्याने दोन मजूर मलब्याखाली दबल्याची घटना समोर आली आहे. मलब्याखाली दबलेल्या या मजुरांची मृत्यूशी झूंज सुरु आहे. एसडीआरएफची टिम पोहचली घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे. (Latest Marathi News Update)

Wardha News
Ahmednagar: भाव मिळेना; निदान कांद्यावर रोटर फिरवण्यासाठी तरी अनुदान द्या! शेतकरी पुत्राचे राष्ट्रपतींना भावनिक पत्र...

याबाबत अधिक माहिती अशी की, गौळ शिवारातील शेतकपी वरभे यांच्या शेतातील ५० फूट खोल विहिरीचे खोदकाम सुरु होते. हे खोदकाम सुरू असतानाच विहिरीचा वरील भाग खचला. विहिरीचा काही भाग खचताना दिसताच काम करीत असलेले दोन मजूर विहिरीबाहेर येण्याची धडपड करीत होते. मात्र, मलब्याखाली दोन्ही मजूर दबले. या घटनेनंतर याबद्दलची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. (Wardha News)

Wardha News
Accident News: मन हेलावणारी घटना! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एकाच कुटूंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू

घटनास्थळी एसडीआरएफची टिम पोहचली असून बचावकार्य सुरु आहे. तसेच तीन जेसीबीच्या सहाय्याने विहिरीतील मलबा उपसण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी आबुराव सोनवणे, तहसीलदार राजू रणवीर, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी धाव घेतली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.