Accident News: मन हेलावणारी घटना! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एकाच कुटूंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू

या अपघातात भारतीय सैन्यात असलेल्या एक जवानांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Buldhana Accident News
Buldhana Accident NewsSaamtv
Published On: 

Buldhana News: भरधाव वेगात येणाऱ्या विटांच्या ट्रकने धडक दिल्याने एकाच कुटूंबातील ३ जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खामगाव तालुक्यातील लाखनवाडा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भारतीय सैन्यात असलेल्या एक जवानांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News Update)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बोरीअडगावमधील राहणारा हार्दिक सुरवाडे (वय ४ वर्ष या मुलाची तब्बेत ठीक नसल्याने त्याला लाखनवाडा येथे दवाखान्यात घेवून जात होते. यावेळी दुचाकीवर त्याचे काका श्रीकांत अर्जुन सुरवाडे (वय,२६ वर्ष) पुजा रोहित वानखेडे (वय, २६वर्ष) काकु कल्पना शुध्दोधन सुरवाडे वय 34 वर्ष हे तीनजण प्रवास करत होते. त्यांची गाडी बोरीअडगाव शिवारामध्ये आली असता आंबेटाकळी कडुन भरधाव वेगाने येणाऱ्या विट वाहतुक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.

Buldhana Accident News
Ahmednagar: भाव मिळेना; निदान कांद्यावर रोटर फिरवण्यासाठी तरी अनुदान द्या! शेतकरी पुत्राचे राष्ट्रपतींना भावनिक पत्र...

या भीषण अपघातात अपघातात मोटारसायकालवरील तिघेजण जागीच ठार झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करित आहे. एकाच कुटूंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.