Hingoli Earthquake: हिंगोलीत २० ते २५ गावांमध्ये भूकंपाचे धक्के; मध्यरात्री नागरिकांची पळापळ, परिसरात घबराट

Hingoli Earthquake News: मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रविवारी (१९ नोव्हेंबर) रात्री जिल्ह्यातील तब्बल २० गावांमध्ये जमीन हादरली आहे.
Good news for common man petrol-diesel price will be cheaper by 5 to 6 rupees central government will take a decision
Good news for common man petrol-diesel price will be cheaper by 5 to 6 rupees central government will take a decisionSaam TV

Hingoli Earthquake Latest News

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रविवारी (१९ नोव्हेंबर) रात्री जिल्ह्यातील तब्बल २० गावांमध्ये जमीन हादरली आहे. त्यामुळे मध्यरात्री नागरिकांची पळापळ झाली असून परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Good news for common man petrol-diesel price will be cheaper by 5 to 6 rupees central government will take a decision
World Cup 2023 Prize: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल; वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला किती पैसे मिळाले? वाचा...

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात (Hingoli News) जमिनीतून गुढ आवाज होत आहे. अधून-मधून जिल्ह्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहे. अचानक जमीन हादरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

रविवारी रात्री औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, येडुत, धामणी,वसई तर वसमत तालुक्यातील, वापटी, कुपटी, पांगरा शिंदे , कुरुंदासह जवळपास २० गावांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूगर्भातून गुढ आवाज येऊन अचानक जमीन हादरली. भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने नागरिकांची पळापळ झाली.

काही घरांमधील भाड्यांची पडझड झाली. त्यामुळे अनेकांनी भीतीपोटी संपूर्ण रात्र जागून काढली. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने पोलीस व महसूल पथक या गावांमध्ये पाठवले असून नागरिकांनी घाबरून जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी ८ नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. वसमत तालुक्यात सर्व गाव झोपेत असताना रात्री १२:४ मिनिटांनी भूकंपाचा जोराचा धक्का जाणवला होता. त्यामुळे सर्व गाव जागा झाला अन् काही वेळातच सर्व नागरीक रस्त्यावर आले होते. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिंदे पांगरा, वापटी, राजवाडी, आंबा, चोंडी स्टेशन, वरताळा आदी ठिकाणची जमीनही हादरली होती.

Good news for common man petrol-diesel price will be cheaper by 5 to 6 rupees central government will take a decision
Petrol Diesel Price: खुशखबर! पेट्रोल-डिझेल ५ ते ६ रुपयांनी स्वस्त होणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com