Shocking : "आई मला माफ कर..." नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; तो शेवटचा व्हिडिओ पाठवला अन्...

Maharashtra Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील पिंपरखेड येथील १८ वर्षीय सुशील ढगे याने नीट परीक्षा अवघड गेल्यामुळे तो मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास सुरु आहे.
HINGOLI STUDENT SUICIDE CASE: 18-YEAR-OLD NEET ASPIRANT ENDS LIFE AFTER ALLEGED EXAM STRESS
HINGOLI STUDENT SUICIDE CASE: 18-YEAR-OLD NEET ASPIRANT ENDS LIFE AFTER ALLEGED EXAM STRESSSaam Tv
Published On
Summary
  • हिंगोलीतील पिंपरखेड गावात १८ वर्षीय मुलाने केली आत्महत्या

  • आत्महत्येपूर्वी त्याने आईला भावनिक व्हिडिओ पाठवून माफी मागितली

  • नीट परीक्षा अवघड गेल्याने तो मानसिक तणावाखाली असल्याची माहिती

हिंगोलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरखेड येथील 18 वर्षीय सुशील विलास ढगे या विद्यार्थ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धक्कादायक म्हणजे या सुशीलला नीटचा पेपर अवघड गेल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. त्याने आईला शेवटचा व्हिडिओ पाठवल्यानंतर विहिरीत उडी मारली असल्याचं पोलिसांनी म्हटलं. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला आहे.

काही महिन्यांपूर्वी देशभरात नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा कथित घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणात विविध राज्यांमधून अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने परीक्षा प्रक्रियेबाबत महत्त्वाचे निर्णय घेत पुन्हा परीक्षा घेण्याची प्रक्रिया राबवली होती.

HINGOLI STUDENT SUICIDE CASE: 18-YEAR-OLD NEET ASPIRANT ENDS LIFE AFTER ALLEGED EXAM STRESS
Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

दरम्यान, दुसऱ्यांदा घेण्यात आलेली नीट परीक्षा सुशील ढगे याला अवघड गेल्याची प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. परीक्षेनंतर तो मानसिक तणावाखाली होता. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या आईची माफी मागत, “आई मला माफ कर, आता मला काही समजत नाही,” असे म्हटले आहे.

HINGOLI STUDENT SUICIDE CASE: 18-YEAR-OLD NEET ASPIRANT ENDS LIFE AFTER ALLEGED EXAM STRESS
Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पुढील प्रक्रिया करण्यात आली. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक नोंदीनुसार, नीट परीक्षा अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com