Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

Sushil Kedias Statement on Raj Thackeray: सुशील केडिया यांनी मराठी भाषेवरील ट्वीटनंतर राज ठाकरे यांची माफी मागितली. मात्र नंतर त्यांनी “मी घाबरून नाही बोललो” असं म्हणत नव्या वादाला तोंड दिलं.
Sushil Kedia On Raj Thackeray
Sushil Kedia On Raj ThackeraySaam Tv
Published On

महाराष्ट्रात मराठी-हिंदीवरून राजकारण तापलंय. त्यामध्ये व्यावसायिक सुशील केडियांनी राज ठाकरे आणि मनसेला चॅलेंज करत वाद ओढावला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी केडियाच्या ऑफिसवर नारळांचा पाऊस पाडत अद्दल घडवली. मनसैनिकांचे रौद्ररूप पाहून केडिया ताळावर आले अन् थेट लाईव्ह कॅमेऱ्यावर माफी मागत मराठी शिकेल असे सांगितले. यावर आता हे प्रकरण शांत होईल असं वाटलं, पण इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर ठाकरेंची माफी मागून केडियांनी पलटी मारली का? असा सवाल उभा ठाकलाय. मी कशा पद्धतीने बोललो त्यावर मला पश्चाताप आहे, पण मी जे बोललो त्याबद्दल नाही, असे म्हणत केडियांनी पुन्हा पायावर दगड मारून घेतलाय.

केडिया नेमकं काय म्हणाले? पलटी मारली ?

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सुशील केडिया म्हणाले, 'माझ्यावर प्रचंड मानसिक दबाव होता. त्यामुळे मी बोललो. मी कशा पद्धतीने बोललो त्यावर मला पश्चाताप आहे, पण मी जे बोललो त्याबद्दल नाही. मराठी न येणाऱ्या लोकांवर हिंसा झाली, म्हणून मी ओव्हररिऍक्ट झालो. मला हिंसा आवडत नाही. म्हणून मी ते ट्वीट केलं', असं केडिया म्हणाले.

Sushil Kedia On Raj Thackeray
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

ते ट्विट का केलं? केडियांचं स्पष्टीकरण

'आता जे काही वातावरण मुंबईत आणि राज्यात सुरू आहे. त्या वातावरणात मी ट्विट केलं. नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे की, मी नेमकी कुठे चूक केली हे सांगावं', असं केडिया म्हणाले. 'माझ्याकडून चूक झाली. पण मी जर ती सुधारत असेल, तर याचा अर्थ असा होत नाही की मी भितीपोटी माघार घेत आहे. माझ्या वक्तव्याचा गैरसमज झाला, म्हणून मी स्पष्टता दिली', असंही केडिया म्हणाले.

केडियाला सात भाषा येतात, पण मुंबईत राहून मराठी येत नाही -

'मी अनेक ठिकाणी प्रवास केला आहे. मला ७ भाषांमध्ये ज्ञान आहे. मात्र मुंबईसारख्या शहरातच भाषेवरून वाद होतो, भावनिक आघात केला जातो, हे मी आतापर्यंत कुठेच पाहिलेलं नाही', असंही केडिया म्हणाले. 'जर एखादा व्यक्ती म्हणत असेल, मी मराठी भाषा बोलताना कम्फर्टेबल नाही तर, त्यालाही तुम्ही अपमान म्हणून घ्याल. कारण काही व्यक्तींच्या अजेंडामध्ये ही गोष्ट आहे. मराठी बोलताना जर कुणाला अडचण येत असेल आणि चुकीचा शब्द निघाला, तेव्हा निश्चितच तुम्हाला मी मराठी भाषेचा अपमान करत असल्याचं वाटेल', असं केडिया म्हणाले.

Sushil Kedia On Raj Thackeray
Actress Father: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

'माझं ट्वीट करण्याची भाषा चुकीची होती. पण ती मी सुधारली आहे. मी मराठीचा अपमान करू इच्छित नव्हतो. माझा हेतू तो नव्हताच', असं स्पष्टीकरण केडिया यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com