Electricity Bill: महाराष्ट्रात वीज स्वस्त, १० ते १४ टक्क्यांनी कपात; प्रति युनिटमागे किती रूपये द्यावे लागणार?

Electricity tariff reduction: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वीज दरामध्ये १० ते १४ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. हे वीज दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. वीज बिल किती रुपयांनी कमी येईल वाचा...
Electricity Bill: महाराष्ट्रात वीज स्वस्त, १० ते १४ टक्क्यांनी कपात; प्रति युनिटमागे किती रूपये द्यावे लागणार?
Electricity tariff reduction brings relief to millions of consumers across Maharashtra from April 1Saam Tv
Published On

Summary -

  • १ एप्रिलपासून नवीन वीज दर लागू

  • १० ते १४ टक्क्यांनी दर कपात

  • सर्व स्लॅबमध्ये दर कमी केले

  • ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार

राज्यातील सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ऐन उन्हाळ्याच्या हंगामामध्ये राज्य सरकारने मोठा निर्णय घेत वीज दरात मोठी कपात केली. १ एफ्रिलपासून हे नवीन दर लागू होणार आहे. १० ते १४ टक्क्यांनी वीज दर कमी होणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना वीजेचे बिल कमी येणार आहे. परिणामी त्यांच्या खिशावरील ताण कमी होईल.

वीज दरामध्ये कपात केल्यामुळे राज्यातील सर्वसामान्यांसाठी नवीन आर्थिक वर्ष दिलासादायक ठरणार आहे. नवीन वीज दरानुसार, विजेच्या वापराच्या सर्व चारही टप्प्यांमधील दरामध्ये कपात करण्यात आली आहे. महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या कंपन्यांनी घरगुती वीज दरांमध्ये कपात केली आहे. तर बेस्ट प्रशासनाने कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त दरामध्ये वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून सर्वांनाच वीज बिल कमी येईल.

Electricity Bill: महाराष्ट्रात वीज स्वस्त, १० ते १४ टक्क्यांनी कपात; प्रति युनिटमागे किती रूपये द्यावे लागणार?
Electricity Bill: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

वीज दर कपातीच्या निर्णयानुसार, ० ते १०० युनिट्सपर्यंतच्या वापरासाठी ९.७ टक्के कपात करण्यात आली आहे. म्हणजे ४.७६ रुपयांऐवजी आता ४.३० रुपये द्यावे लागणार आहे. १०१ ते ३०० युनीटसाठी १०.८ टक्के कपात केली आहे. म्हणजेच ७,९६ ऐवजी ७.१० रुपये द्यावे लागणार आहेत. ३०१ ते ५०० युनीटमध्ये १४ टक्के कपात करण्यात आली आहे. म्हणजेच १३.५५ ऐवजी आता ११.६४ रुपये द्यावे लागणार आहेत. तर ५०० पेक्षा अधिक युनीटमध्ये १३.१ टक्के कपात करण्यात आली आहे. म्हणजे आता १४.५५ रुपयांऐवजी १२.६४ रुपये द्यावे लागणार आहेत.

Electricity Bill: महाराष्ट्रात वीज स्वस्त, १० ते १४ टक्क्यांनी कपात; प्रति युनिटमागे किती रूपये द्यावे लागणार?
Electricity Prices: देशभरात वीज होणार स्वस्त; पावर ट्रेडिंग शुल्काबाबत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा मोठा निर्णय

दरम्यान, महावितरण, अदानी, बेस्ट आणि टाटा यासारख्या वीज वितरण कंपन्यांनीच नवीन वीजदर लागू करण्याबाबत एक प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठवला होता. या वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली. या मंजुरीनंतर वीज दरात कपात करण्यात आली आहे. या कंपन्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर आधारित नवीन वीज दर निश्चित करण्यात आले आहेत. याचा फायदा राज्यातील सर्वसामान्यांना होणार आहे. या निर्णयामुळे महागाईमुळे त्रस्त झालेल्या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Electricity Bill: महाराष्ट्रात वीज स्वस्त, १० ते १४ टक्क्यांनी कपात; प्रति युनिटमागे किती रूपये द्यावे लागणार?
Reduce Electricity Bill : तुम्हालाही लाईट बिल प्रमाणाच्या बाहेर येतय? कमी करण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com