Electricity Bill: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

Electricity Charges Reduced: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. १ एप्रिलपासून वीज बिल कमी होणार आहे. कारण वीज दरात कपात करण्यात आली आहे.
Electricity Bill: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?
Electricity BillSaam Tv
Published On

Summary -

  • १ एप्रिलपासून वीज दरात कपात लागू

  • सर्व वीज कंपन्यांचा संयुक्त निर्णय

  • सर्व युनीट स्लॅबमध्ये दर कमी

  • ग्राहकांना महागाईत मोठा दिलासा मिळणार

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक वर्ष दिलासादायक ठरणार आहे. राज्यभरातील वीज दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून नवीन दर लागू होणार आहेत. महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या कंपन्यांनी घरगुती वीज दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः बेस्ट प्रशासनाने कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त दरात वीज देण्याचा निर्णय घेतलाय.

महावितरण, अदानी, बेस्ट आणि टाटा या वीज वितरण कंपन्यांनीच नवीन वीजदर लागू करण्याबाबत एक प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली. या मंजुरीनंतर वीज दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Electricity Bill: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?
Electricity Bill: अव्वाच्या सव्वा वीज बिल आलेय? व्हॉट्सअ‍ॅपवरुन २ मिनिटात करा तक्रार, झटक्यात प्रॉब्लेम संपेल

१ एप्रिलपासून वीज बिल किती आकारले जाणार?

२०२६-२७ या आर्थिक वर्षात ० ते १०० युनीटसाठी ४.३ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी ४.७६ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात ९.७ टक्के कपात करण्यात आली आहे.

२०२६-२७ या आर्थिक वर्षात १०१ ते ३०० युनीटसाठी ७.१ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी ७.९६ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १०.८ टक्के कपात केली आहे.

Electricity Bill: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?
Electricity Prices: देशभरात वीज होणार स्वस्त; पावर ट्रेडिंग शुल्काबाबत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा मोठा निर्णय

२०२६-२७ या आर्थिक वर्षात ३०१ ते ५०० युनीटसाठी ११.६४ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी १३.५५ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १४ टक्के कपात करण्यात आली आहे.

तर, २०२६-२७ या आर्थिक वर्षात ५०० पेक्षा युनीटसाठी १२.६४ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी १४.५५ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १३.१ टक्के कपात करण्यात आली आहे.

Electricity Bill: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?
Reduce Electricity Bill : तुम्हालाही लाईट बिल प्रमाणाच्या बाहेर येतय? कमी करण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com