Gondia Accident : शाळेची बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Gondia Accident News : गोंदियात शाळेची बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पत्नी गंभीर जखमी झाली.
शाळेची बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
accident Saam tv
Published On

शुभम देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुचाकी आणि शाळेच्या बसचा अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीस्वार पतीचा मृत्यू झाला आहे. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या महिलेला जवळील रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

गोंदियाच्या शिरोली महागावजवळ दुचाकी आणि स्कूल बसमध्ये समोर समोर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात अर्जुनी मोरगाव येथे वीज वितरण विभागात कार्यरत असणारे कर्मचारी ४५ वर्षीय हरिदास कोहरे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबत असणारी त्यांची पत्नी इंदू कोहरे वय 40 वर्ष या गंभीर जखमी झाल्या. त्यांना ब्रह्मपुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शाळेची बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
Junnar Accident : अंत्यविधीवरुन परतताना ट्रकनं उडवलं; ५ जणांचा जागीच मृत्यू , ८ गंभीर; कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात VIDEO

गोंदियाच्या महागाव येथील रहिवासी असलेले हरिदास कोहरे हे अर्जुनी मोर येथील विद्युत विभागात शासकीय सेवेत कार्यरत होते. अर्जुनी मोर येथून स्वगावी महागाव येथे खरीप हंगामातील भात पीक लागवडीकरिता शेतात पत्नीसह जात असताना दुर्दैवी घटना घडली.

शाळेची बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
Solapur Accident: चालकाला फिट आली अन् भरधाव बस उलटली; ३५ ते ४० प्रवासी थोडक्यात बचावले, केबिनवरच दिला ड्रायव्हरला सीपीआर VIDEO

राधिका पेट्रोल पंप शिरोलीच्या जवळ शाळेच्या बसने समोरासमोर धडक दिल्याने कोहरे रोडवर पडले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांची पत्नी ही गंभीर जखमी झाली आहे. कोहरे यांच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जुन्नरमध्ये भीषण अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

जुन्नरच्या नगर-कल्याण महामार्गावर अंत्यविधीवरुन परत जात असताना भरधाव ट्रकने नागरिकांना चिरडल्याची घटना घडली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर मागील पाच तासांपासून नगर-कल्याण महामार्गावर नातेवाईकांनी रास्तारोको आंदोलन सुरु करत वाहतुक बंद केली आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com