Junnar Accident : अंत्यविधीवरुन परतताना ट्रकनं उडवलं; ५ जणांचा जागीच मृत्यू , ८ गंभीर; कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात VIDEO

Truck Crush People 5 dead At Belhe Gunlunchwadi: जुन्नरमध्ये ट्रकने नागरिकांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झालाय.
ट्रकने नागरिकांना चिरडल्याची घटना
Junnar AccidentSaam Tv
Published On

रोहिदास गाडगे, साम टीव्ही पुणे

जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे कल्याण नगर महामार्गावर ट्रकने नागरिकांना चिरडल्याची घटना घडली. अंत्यविधीवरुन परतत असताना अपघात झालाय. गावातील व्यक्तीची अंत्यविधी कार्यक्रम संपल्यानंतर रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडलं. या अपघातानंतर गावकरी आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे. रास्ता रोकोची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

नक्की काय घडलं?

जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे ग्रामस्थ एका व्यक्तीच्या अंत्यविधिवरून परतत होते. त्यावेली त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने (Junnar Accident) चिरडलं. यामध्ये पाचजणांचा मृत्यू झालाय तर ८ जण गंभीर जखमी झालेत. कल्याण नगर महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय. जखमींना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात

या अपघातानंतर गावात तणावाचं वातावरण (Accident News) आहे. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं समोर आलंय. अपघातानंतर नागरिकांचा कल्याण नगर महामार्गावर रास्तारोको सुरु आहे. घटनास्थळी पोलीस पथक (Pune News) दाखल झाल्याची माहिती मिळतेय. अंत्यविधीवरुन परततानाच काळाने घाला घातला आहे. भरधाव ट्रकने चिरडल्यामुळे एकाच वेळी ५ व्यक्तींचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कल्याण-नगर मार्गावर हा भीषण अपघात झाल्याचं आज समोर आलंय.

ट्रकने नागरिकांना चिरडल्याची घटना
Jalgaon Accident: जळगावमध्ये थरारक अपघात! भरधाव कारने ५ महिला, २ चिमुकल्यांना उडवलं; १ जागीच ठार

पंढरपूरमधील अपघाताची घटना

पंढरपूरमध्ये पिंपळनेरजवळ एसटी बसचा भीषण अपघात झालाय. माढा तालुक्यातील पिंपळनेर जवळ एसटी बस चालकाला फिट आल्याने अपघात झाल्याची माहिती मिळतेय. यामध्ये बस मधील २४ प्रवाशी जखमी (Road Accident) झालेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

ट्रकने नागरिकांना चिरडल्याची घटना
Solapur Accident: चालकाला फिट आली अन् भरधाव बस उलटली; ३५ ते ४० प्रवासी थोडक्यात बचावले, केबिनवरच दिला ड्रायव्हरला सीपीआर VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com