

जळगावच्या बाजारात सोने-चांदीत घसरण झाली आहे.
जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव जीएसटी सह 1 लाख 60 हजार रुपयांवर
तर चांदीचे भाव 2 लाख 54 हजार रुपयावर जाऊन पोहोचले आहेत
संजय महाजन, साम टीव्ही
जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जळगावच्या बाजारात आज सोन्याचे भाव 1 लाख 60 हजार GST सह जाऊन पोहचले आहेत. तर चांदीचे भाव जीएसटी सह 2 लाख 54 हजार प्रति किलो जाऊन पोहोचली आहे. ऐन लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सराफा व्यापाऱ्याने सांगितलं की, 'ही ट्रेडिंग सायकल आहे. शेअर बाजारात पुरवठा आणि मागणी वाढल्यानंतर भाव कोसळतात. तसाच प्रकार सोन्यासोबत झाला आहे. सोने खरेदी-विक्रीतील ताणामुळे त्यामुळे भाव घसरला आहे. सोन्याचा भाव आज 1 लाख 60 हजार GST सह पोहोचला आहे. तर चांदी 2 लाख 54 हजार प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे'.
'आम्ही गुंतवणूकदारांना सांगू इच्छितो की, कोणतीही गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी चांगली असते. गुंतवणूक केल्यानंतर मिळालेला परतावा पाहा. सोन्याने चांगले परतावा दिला आहे. सोने हे उत्तम गुंतवणूक आहे. सोन्याचे भाव २ हजारांनी कोसळला आहे. तर चांदीचा भाव ९ हजारांनी कोसळला आहे, असे व्यापाऱ्याने पुढे सांगितले.
मुंबईतही सोन्याचा भाव कोसळला
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर १३१० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर आज सोमवारी १५६४४० रुपयांवर पोहोचला आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचा दर १०४८ रुपयांनी घसरल्याने १,२१५२ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
२२ कॅरेट सोन्याचा दर किती?
गुडरिटर्नच्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, २२ कॅरेट सोन्याचा दर १२०० रुपयांनी घसरलाय. त्यामुळे २२ कॅरेट सोन्याचा दर हा १.४३ लाखापर्यंत पोहोचला आहे. ८ ग्रॅममागे ९६० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे ८ ग्रॅम सोन्याचा भाव १,१४,७२० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.
१८ कॅरेट सोन्याचे दर किती?
१८ कॅरेट सोन्याचे दर हजार रुपयांनी घसरला. त्यामुळे १८ कॅरेट सोन्याचे दर १,१७,३३० रुपयांपर्यंत पोहोचलाय. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ७८४ रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे ८ ग्रॅम सोन्याचा दर ९३,८६४ रुपये झालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.