

धाराशिवात घडली दुर्दैवी घटना
उमरगा तालुक्यात मुख्याधापकाने आयुष्य संपवलं
मुख्याधापकाच्या आत्महत्येने शैक्षणिक वर्तुळात खळबळ
बालाजी सुरवसे, साम टीव्ही
संस्थाचालक आणि सहकाऱ्याच्या जाचाला कंटाळून प्रभारी मुख्याध्यापकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील चिचकोट येथील महात्मा गांधी विद्यालयातील ही दुर्दैवी घटना आहे. प्रभारी मुख्याध्यापकांनी गळफास घेत जीवन संपवलं.
प्रभारी मुख्याध्यापकांनी संस्थाचालक आणि सहकारी शिक्षकाकडून त्रास होत असल्याची चिठ्ठीत म्हटलं आहे. संस्थाचालकाकडून पैशाची मागणी केली जात असल्याचंही चिठ्ठीत उल्लेख आहे. तानाजी विठ्ठलराव जाधव असे प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे. तानाजी यांनी रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी जाधव यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये संस्थाचालक आणि सहकाऱ्यांच्या होत असलेल्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. संबंधित आत्महत्येशी संबंधित चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठवला आहे.
अंबरनाथमध्ये डॉक्टर स्वप्नाली गायकर यांचा आत्महत्येचा प्रयत्न
अंबरनाथमध्ये एका ६ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर काही सामाजिक कार्यकर्ते मानसिक त्रास देत आहे, असा आरोप करत डॉक्टर स्वप्नाली गायकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. परंतु सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप फेटाळून लावलेत आहे.
अंबरनाथच्या महालक्ष्मीनगरपरिसरात विजय विनोद जयस्वाल या मुलाला सर्दी खोकला झाला. त्यानंतर त्याच्यावर अंबरनाथमधील डॉ. स्वप्नाली गायकर यांच्याकडे उपचार सुरू होते. गायकर यांच्याकडे तिसऱ्या दिवशी घरी गेल्यावरही त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना खासगी, सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, तिकडे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.