Gokul Milk: सर्वसामान्यांना झटका! अमूलपाठोपाठ गोकुळचे दूध महागणार, प्रतिलिटर ४ रुपयांनी वाढ होणार

Gokul Milk Price Hike: गोकुळ दुधाच्या दरात वाढ होणार आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दूधाचे दर प्रतिलिटर ४ रुपयांनी वाढले जाण्याची शक्यता आहे.
Gokul Milk: सर्वसामान्यांना झटका! अमूलपाठोपाठ गोकुळचे दूध महागणार, प्रतिलिटर ४ रुपयांनी वाढ होणार
Gokul Milk Price HikeSaam Tv
Published On: 

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अमूल आणि इतर खासगी कंपनींच्या दूधाच्या दरात वाढ झाली. त्यापाठोपाठ आता गोकुळ देखील दुधाचे दर वाढणार आहे. गोकुळ दूध संघाच्या विक्री दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. तर दूध उत्पादकांकडून खरेदी करताना प्रति लिटर २ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून विक्रीचे नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.

अमूलसह राज्यातील दूध संघांनी म्हैस आणि गाय दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ केली. त्यानंतर आता गोकुळ दूध संघ काय निर्णय घेतोय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील वितरकांशी चर्चा करून दरवाढीचा निर्णय घेणार असल्याचे जरी संघ व्यवस्थापनाने सांगितले असले तरी विक्रीमध्ये प्रतिलिटर ४ तर खरेदीमध्ये २ रुपये वाढीचा प्रस्ताव आहे. विक्रेत्यांसह नेत्यांसोबत चर्चा करून २ दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Gokul Milk: सर्वसामान्यांना झटका! अमूलपाठोपाठ गोकुळचे दूध महागणार, प्रतिलिटर ४ रुपयांनी वाढ होणार
Gokul Election : सतेज पाटलांना मोठा धक्का! कोरमच्या खेळात महायुतीने बाजी मारली; 'हा' नेता बनला गोकुळचा नवा अध्यक्ष

दुष्काळामुळे राज्यातील दूध उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे 'अमूल' सह राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांनी दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या संघांनी वाढीव दराची अंमलबजावणी केली असली तरी 'गोकुळ'ने अद्याप निर्णय घेतलेला नाही. 'गोकुळ'च्या अध्यक्षांची निवड होऊन ८ दिवस झाले असून अध्यक्ष राजेश पाटील यांनी दरवाढीबाबत चाचपणी केली आहे. संचालकांसोबत चर्चा करून दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असला तरी ही दरवाढ किती करायची याबाबत नेत्यांशी बोलून शिक्कामोर्तब केले जाणार आहे. येत्या शनिवारपासून गोकुळच्या दुधाचे नवीन दर लागू होण्याची शक्यता आहे.

Gokul Milk: सर्वसामान्यांना झटका! अमूलपाठोपाठ गोकुळचे दूध महागणार, प्रतिलिटर ४ रुपयांनी वाढ होणार
Gokul Milk : अमूल आणि मदर डेअरीनंतर आता गोकुळ दूधही महागणार? हालचालींना वेग, पहिल्या बैठकीत काय ठरणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.