
Chandrapur : जागतिक महिला दिनी (Jagtik mahila din) पहाटेच्या सुमारास चंद्रपूर (chandrapur) शहरात एका युवतीने गुडबाय म्हणत जगाचा निराेप घेतला. युवतीच्या आत्महत्येने तिच्या मैत्रिणींना माेठा धक्का बसला आहे. (Breaking Marathi News)
ही युवती चंद्रपूर शहरातील घुटकाळा वार्डात भाड्याच्या घरात राहत होती. मूळ भंडारा जिल्ह्यातील करांडला येथील रहिवासी असलेली गायत्री रामटेके (gayatri ramteke) ही स्पर्धा परीक्षेसाठी चंद्रपुरात वास्तव्याला होती.
आज पहाटे स्वतःच्या रूमवर गायत्रीने आत्महत्या केली. मात्र त्याआधी तिने समाज माध्यमातून हे माझे शेवटचे चित्र गुड बाय असे म्हणत पोस्ट टाकली. या घटनेची माहिती परिसरात कळताच नागरिकांनी पोलिसांना बाेलावले. शहर पोलीस ठाण्याचे पथक प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. जागतिक महिला दिनी (International Women's Day 2023) युवतीने केलेल्या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.