
ताडोबातील माया वाघीणीची माया पर्यटकांनी नुकतीच मनसोक्त अनुभवली. सकाळच्या फेरीत पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना वाटेतच माया वाघीण आपल्या तीन महिन्यांच्या बछड्यासह कोवळ्या उन्हात उभी असलेली दिसली. (Maya Tigress Latest Marathi News)
ती आपल्या पिलासह (tiger) खेळत असताना पर्यटक पाेहचले. त्यांच्या कॅमेराचा खळखळ आवाज झाल्याने माया विचलित झाली. त्यानंतर तिने आपल्या पिलाला जबड्यात उचलून जंगलात जाणे पसंत केले.
मुलांच्या संदर्भात संवेदनशील असलेली आई यानिमित्ताने दिसून आली. पिलांची सुरक्षितता ही तिच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे या प्रसंगातून दिसून आले. मायाचे हे रूप पर्यटकांनाही (tourists) सुखावून गेले. मायाचा हा व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळेंपर्यंत पाेहचताच त्यांनी ताे ट्विट करुन जनतेपर्यंत पाेहचविला. (Maharashtra News)
अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण अशी ओळख ‘माया’ ची आहे. जेवढी प्रेमळ तेवढीच ती आक्रमक असल्याचे सांगण्यात येते. पर्यटकांना ती कधी एकटी, कधी सहकारी वाघांसह तर कधी पिल्लांबरोबर दिसून येते. कित्येकदा तर ती तिच्या पिल्लांबरोबर मायेचे क्षण अनुभवताना दिसून आली आहे आणि म्हणूनच कदाचित तिचे नाव ‘माया’ पडले असावे असे पर्यटक मार्गदर्शक सांगतात.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.