गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

Mumbai Goa Highway Heavy Vehicle Ban Dates: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाच्या जड-अवजड वाहनांवर विविध टप्प्यांत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
16 ton heavy vehicle restrictions on Mumbai Goa National Highway 66
16 ton heavy vehicle restrictions on Mumbai Goa National Highway 66saam tv
Published On

सचिन कदम, साम टीव्ही

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वाहतूक सुरळीत व्हावी आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर विविध टप्प्यांत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गणेशोत्सवपूर्व तयारी व मूर्तींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर 11 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री 00.01 पासून 15 सप्टेंबर रोजी रात्री 11 पर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या ट्रक, मल्टीॲक्सल, ट्रेलर, लॉरी आदी जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीस पूर्णतः बंदी राहणार आहे.

16 ton heavy vehicle restrictions on Mumbai Goa National Highway 66
6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

तसेच पाच दिवसांच्या गणपती विसर्जन व परतीच्या प्रवासासाठी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत, सात दिवसांच्या गणपती तसेच गौरी-गणपती विसर्जन व परतीच्या प्रवासासाठी 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 20 सप्टेंबर रोजी रात्री 11 पर्यंत निर्बंध लागू राहतील. अनंत चतुर्दशीच्या 12 दिवसांच्या गणपती विसर्जन व परतीच्या प्रवासासाठी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 26 सप्टेंबर रोजी रात्री 8 पर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. नोंदणीकृत वाहनांची वजनक्षमता ठरविताना मालासह वाहनाचे एकूण वजन अर्थात टोटल ग्रॉस व्हेईकल वेट ग्राह्य धरले जाणार आहे.

16 ton heavy vehicle restrictions on Mumbai Goa National Highway 66
Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

निर्बंधातून जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांची वाहने वगळली

या निर्बंधातून जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, तसेच दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व अन्य नाशवंत व जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने वगळण्यात आली आहेत. पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन तसेच अन्य अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाही हे निर्बंध लागू राहणार नाहीत.

16 ton heavy vehicle restrictions on Mumbai Goa National Highway 66
शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील रुंदीकरण व दुरुस्तीच्या कामासाठी तसेच संबंधित साहित्य व मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही निर्बंधातून वगळण्यात आले आहे. अशा वाहनांना संबंधित वाहतूक विभाग किंवा महामार्ग पोलिसांकडून प्रवेशपत्र देण्यात येणार आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची सुरक्षित व सुरळीत वाहतूक आणि महामार्गावरील परिस्थिती लक्षात घेऊन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक परिस्थितीनुसार जड-अवजड वाहनांवरील निर्बंध शिथील करण्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतील. तसेच जेएनपीटी व जयगड बंदरातून होणारी आयात-निर्यात मालाची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक वाहतूक नियोजन करण्याचे निर्देश परिवहन विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com