FYJC Admission 2026: अकरावी प्रवेशासाठी मोठा निर्णय! गुणपत्रक अन् शाळा सोडल्याचा दाखला नसतानाही मिळणार प्रवेश

Class 11 Admission 2026: अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास तात्पुरती सूट देण्यात आली आहे. विद्यार्थी हमीपत्रावर प्रवेश घेऊ शकतील.
Class 11 Admission 2026
Class 11 Admission 2026google
Published On
Summary

गुणपत्रक आणि टीसीशिवाय अकरावी प्रवेशाला तात्पुरती परवानगी

हमीपत्राच्या आधारे प्रवेश निश्चित करता येणार

मुदतीत कागदपत्रे न दिल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो

सध्या दहावी पास विद्यार्थ्यांची कॉलेजच्या अॅडमिशनसाठी धावपळ सुरु असताना दिसत आहे. यामध्ये सुरुवातीला ऑनलाइन अॅडमिशनच्या वेळेस त्यांना वेबसाइटवर लोड आल्याने मुदत वाढवून देण्यात आली होती. आता अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजेच गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला न मिळाल्याने अनेक अडचणींना सामोरं लागणार आहे.

दहावी पास विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. काही विद्यार्थ्यांना शाळेकडून गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नसल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोठा दिला देणारा निर्णय घेतला आहे. यामध्ये अकरावीचे अॅडमिशन करताना गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती करता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

Class 11 Admission 2026
Dog Bark Safety: 'या' ४ वस्तू जवळ ठेवा, कुत्रा कधीच हल्ला करणार नाही

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला. तसेच याचा शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि कनिष्ट महाविद्यालयांना महत्वाच्या सुचना जारी केल्या.

राज्यामध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. याची पहिली फेरी २९ मे २०२६ रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली. पण बऱ्याच विद्यार्थांकडे अजुनही मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नाही. त्यामुळे अॅडमिशनमध्ये कोणत्याही अडचणी होऊ नयेत, यासाठी ही अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे.

Class 11 Admission 2026
AC Side Effects: दिवसभर AC मध्ये राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना दिलासा देत शालेय शिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला नसतानाही हमीपत्राच्या आधारे प्रवेश निश्चित करता येणार आहे. आधार पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका डिजीलॉकरवर उपलब्ध होतील. पण ठराविक मुदतीत कागदपत्र सादर केले नाही तर प्रवेश रद्द होऊ शकतो, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com