Sakshi Sunil Jadhav
कुत्रा हा बऱ्याच जणांचा आवडता प्राणी असतो. पण काही माणसं त्याला बघून दहा पावलं लांबच जातात.
कुत्रा कितीही आवडता प्राणी असला तरी त्याच्या चावणं हे खूप घातक ठरू शकतं.
कधी-कधी रात्री प्रवास करताना कुत्री अचानक अंगावर हल्ला करतात. अशावेळी बचावासाठी तुम्ही पुढील ४ वस्तूंचा वापर करू शकता. त्याने कुत्री तुमच्या आसपासही फिरकणार नाहीत.
सगळ्यात आधी कुत्रा भुंकायला लागल्यावर तिथून पळ काढू नका. शांत उभे राहा.
जेव्हा कुत्रा भुंकतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांकडे पाहू नका. खाली किंवा आजुबाजुला पाहत राहा.
रात्री जर कुत्री अंगावर येत असतील तर सोबत बॅग, जॅकेट, छत्री किंवा पाण्याची बाटली ठेवा. त्याने कुत्र्याच्यामध्ये आडवी धरा.
कुत्र्याला ओरडा म्हणजेच हकला. त्याने कुत्रा हळूहळू मागे जातो. कधीकधी तो घाबरून पळून जातो.
बऱ्याचदा कुत्री ही त्यांच्यावर हल्ला करायला माणसं येतायेत, असं समजून भूंकतात.