Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत खायचं असेल तर तुम्ही पुढील सोपी पोटॅटो पॅनकेक्सची रेसिपी वाचू शकता.
तीन बटाटे, १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, २ चमचे तांदळाचं पीठ, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरं, मीठ, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, तव्यावर शेकण्यासाठी तेल किंवा बटर.
सर्वप्रथम बटाटे सोला मग ते किसून ते पाण्यात ठेवा. मग हलकेसे पिळून घ्या.
पुढे तुम्ही एका भांड्यात किसलेले बटाटे, कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं एकत्र करून घ्या. त्यामध्ये तांदळाचं पीठ, मीठ आणि काळीमिरी पूड मिक्स करून घ्या.
पुढे तवा गरम करून त्यावर थोडं तेल किंवा बटर लावा. मग तयार साहित्याचे छोटे गोळे थापून तव्यावर पसरून गोल करा.
आता दोन्ही बाजुंनी सोनेरी रंग होईपर्यंत ते शेकवून घ्या. गरमागरम पोटॅटो पॅनकेक्स टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबर सर्व्ह करा.
पोटॅटो पॅनकेक्स ही एक कुरकुरीत आणि चविष्ट स्नॅक डिश आहे. त्यामुळे त्याचे टेक्चर कुरकुरीतच ठेवा.
टोमॅटो सॉस, दही किंवा विविध चटण्यांसोबत तुम्ही पोटॅटो पॅनकेक्स सर्व्ह करू शकता.