

अजित पवार यांच्या विमान अपघातावर शंकांचं काहूर
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून घातपाताची शक्यता व्यक्त
हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली चौकशीची केली मागणी
पराग ढोबळे, साम टीव्ही
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अनेक नेतेमंडळी शंका उपस्थित करत आहेत. अजित पवारांच्या मृत्यूनंतर अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे पाटील यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनीही शंका उपस्थित केली आहे. आता यात शरद पवार गटानेही उडी मारली आहे. शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही अजितदादांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित केली आहे.
अनिल देशमुख यांनी नागपुरात साम टीव्हीशी संवाद साधला. यावेळी अनिल देशमुख यांनी अजित पवारांचा विमान अपघात, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मोठं भाष्य केलं., 'सिव्हिल एव्हिएशनकडून सांगण्यात आलं की, व्हिजिबिलिटी नव्हती. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये विमान लँडिंग करताना तिरपं झालं. त्यानंतर क्रॅश झालं. विमान अचानक तिरपं होऊ क्रॅश झालं. त्यामुळे सर्वांना शंका आहे की, घातपात आहे की आणखी काय, असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. अजित पवार गटाचे अनेक आमदार असो छगन भुजबळ असो अमोल मिटकरी असो या लोकांनी शंका व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितलं.
'अपघात ज्या पद्धतीने झाला, त्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. संजय राऊत यांनी जी मागणी केली, या संपूर्ण घटनेची हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली चौकशी झाली पाहिजे. त्या मागणीला माझं समर्थन आहे. संवेदनशील विषय असतात, तेव्हा हायकोर्टाच्या माध्यमातून त्यांच्या नियंत्रणाखाली चौकशी झाली, तर महाराष्ट्र आणि देशासमोर नेमकं काय झालं, घातपात आहे की अपघात आहे हे लोकांसमोर येईल आणि लोकांच्या शंका दूर होतील, असे ते म्हणाले.
'राज्याचा माजी गृहमंत्री होतो, त्यावेळी संवेदनशील विषयांमध्ये सीआयडी चौकशी व्हायची. संवेदनशील चौकशीमध्ये सरकारचा दबाव असतो. त्यामुळे सरकारी हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या नियंत्रणाखालीच चौकशी झाली पाहिजे. त्याच्याशिवाय अजित पवार यांच्या संदर्भात दुर्घटना झाली. हे हे लोकांसमोर एकत्र येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणर बोलताना देशमुख म्हणाले, 'आतापर्यंत अजित पवार यांच्यासोबत पक्षाच्या नेत्यांच्या १४ बैठका झाल्या आहेत. अनेक बैठकांमध्ये मी स्वतः उपस्थित होतो. शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, रोहित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड देखील होते. जयंत पाटील यांच्या घरी अजितदादा सोबत दहा वाजता बैठक सुरू झाली. ती रात्री तीन वाजता बैठक संपली होती. त्यामध्ये सविस्तर चर्चा झाली होती, त्या चर्चा सर्वांना माहीत होत्या, असेही त्यांनी सांगितले.
'एक बैठक सुप्रिया सुळे, अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्यासोबत सुद्धा झाली. त्यावर सुप्रिया सुळे सविस्तर बोलतील आता दु:ख असल्याने त्या बोलत नसतील. दुखवट्याचा वेळ संपल्यानंतर तेव्हा कुठे मीटिंग झाली, किती वाजता झाली, किती वेळ चालली? कोण उपस्थित होतं. प्रत्येक मीटिंगमध्ये काय काय ठरलं हे सगळं सविस्तरपणे सांगू. सध्या याबाबतीत दुखवटाचा काळ असल्यामुळे काही बोलणार नाही, पण सविस्तरपणे पुढील काळामध्ये सांगणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.