Chandrapur News: चंद्रपुरात संभाजी भिडे यांच्या नियोजन बैठकीदरम्यान आयोजक व विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. चंद्रपूरच्या अग्रसेन भवन दाताळा मार्ग परिसरात संभाजी भिडे यांच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा प्रवेश आणि बैठकीला उलगुलान संघटना व आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. हिंदवी स्वराज्य सुर्वण सिंहासन आणि खडा पहारा संदर्भात असलेली भिडे यांची ही नियोजन बैठक उधळून लावण्याचा इशारा देत शेकडो विरोधी कार्यकर्ते बैठकस्थळी पोचले.
विरोधी कार्यकर्ते बैठक स्थळीप्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दोन्हीकडून जोरदार नारेबाजी झाली. पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावत नारेबाजी करणाऱ्या उलगुलान संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. चंद्रपुरात घटनाविरोधी -देशविरोधी संभाजी भिडे यांचे नियोजन हाणून पाडणार असल्याचा निर्धार विरोधी कार्यकर्त्यांनी अटकेनंतर व्यक्त केला. भिडे गुरुजींची नियोजन बैठक मात्र पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार सुरू झाली आहे.
संभाजीनगरमध्ये आयोजकांवर अखेर गुन्हा दाखल
संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर संभाजीनगरच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
20 जुलै रोजी संभाजी भिडे यांचा गंगापूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गंगापूर शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशाला व राष्ट्राला हानीकारक असणारे वक्तव्य करण्याचा हेतू आहे.
त्यामुळे शहारातील व तालुक्यातील शांतता बिघडवण्याचे काम होण्याची दाट शक्यता असल्याचा दावा करत या कार्यक्रमाला परवानगी न देण्याचे निवेदन पोलिसांना काही संघटनांनी दिले होते. त्यामुळे पोलिसांनी भिडे यांच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. मात्र तरीही भिडे यांचा कार्यक्रम झाल्याने पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.