Bangaladesh Bus Accident: बांगलादेशमध्ये प्रवाशांनी खचाखच भरलेली बस तलावात कोसळली, ३ चिमुकल्यांसह १७ जणांचा मृत्यू

Bangaladesh Bus Falls Into Pond: चालकाने बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे.
Bangaladesh Bus Accident
Bangaladesh Bus AccidentSaam Tv

Bangaladesh News: बांगलादेशमध्ये बसला भीषण अपघात (Bangaladesh Bus Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली बस तलावामध्ये (bus falls into pond) कोसळली. या अपघातामध्ये १७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन लहान मुलं आणि ८ महिलांचा समावेश आहे. ही घटना बांगलादेशच्या झालाकाथी येथील छत्रकंडा भागामध्ये शनिवारी घडली. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Bangaladesh Bus Accident
Tamil Nadu crime : एकीकडे मित्र बर्थडे केक कापत होता, दुसरे मित्र रिक्षावाल्याला भोसकत होते; भयंकर घटनेने खळबळ

मिळालेल्या माहितीनुसर, बांगलादेशातील छत्रकांडा भागात तलावाच्या कडेला असलेल्या रस्त्यावरुन प्रवाशांनी खचाखच भरलेली बस जात होती. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट तलावामध्ये कोसळली. तलावामध्ये पाणी जास्त असल्यामुळे प्रवाशांना आपला जीव वाचवता आला नाही. काही प्रवाशांनी खिडकीतून बाहेर येत आपला जीव वाचवला. पण काही प्रवाशांना बाहेर पडता न आल्यामुळे बसमध्येच बुडून त्यांचा मृत्यू झाला.

Bangaladesh Bus Accident
Justyn Vicky Dies in Gym Video: 210 किलो वजनाचा बारबेल उचलताना मानेवर पडला, प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा जागीच मृत्यू; व्हिडीओ आला समोर...

या भीषण अपघातामध्ये तीन लहान मुलांसह १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 35 जण जखमी झाले आहेत. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामध्ये बचावलेले प्रवासी बस चालकालाच दोषी ठरवत आहेत. चालकाने बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला आहे. 52 लोकांची क्षमता असलेल्या बशर मेमोरियल परिवहन बसमध्ये 60 हून अधिक लोक होते.

Bangaladesh Bus Accident
Jalgaon Accident News : सुसाट कारचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार उलटली; महामार्गावरील थरार

पिरोजपूर येथील भंडारिया येथून सकाळी ९ वाजता निघालेली बस बारिशाल-खुलना महामार्गावरील छत्रकांडा येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास पोहचली. त्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात ही बस पडली. बारिशालचे विभागीय आयुक्त एमडी शौकत अली यांनी सांगितले की, अपघातात 17 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेले बहुतेक प्रवासी हे भंडारिया उपजिल्हा आणि झालकाठीच्या राजापूर भागातील रहिवासी होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com