Shinde Vs Thackeray : औरंगाबादचे ५ मजली शिवसेना भवन कुणाकडे; शिवसेना, शिंदे-ठाकरे गट भिडले

शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर शिंदे-ठाकरे गट आमनेसामने आले आहेत.
Shivsena Bhavan At Aurangabad
Shivsena Bhavan At AurangabadSAAM TV
Published On

नवनीत तापडिया

Aurangabad Shivsena Bhavan : मुंबई येथील शिवसेना भवन हे आमच्यासाठी प्रॉपर्टी नसून मंदिर आहे. आम्ही मुंबईच्या शिवसेना भवनवर दावा करणार नाही, असं शिंदे गटाकडून सांगण्यात आलं होतं. पण औरंगाबाद येथे औरंगपुऱ्यातील शिवसेना भवनसाठी शिंदे गटाने दंड थोपटले आहेत. आम्ही शिवसेना भवन ताब्यात घेणार असल्याची माहिती शिंदे गटाने दिली आहे.

बाळासाहेबांच्या शिवसेनेला (Shivsena) धनुष्यबाणाचे चिन्ह आणि शिवसेना पक्ष नाव मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आक्रमक झाला आहे. शहरातील औरंगपुरा भागात उभारलेले पाच मजली शिवसेना भवन देखील आता आमचेच असून, आगामी काळात ते ताब्यात घेणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. यावरून औरंगाबादचे राजकीय वातावरण तापले आहे. (Maharashtra Politics)

Shivsena Bhavan At Aurangabad
Shivsena Bhavan : ठाकरे की शिंदे? शिवसेना भवन कुणाकडे राहणार? मनसे नेत्याचं सूचक ट्विट

शहरातील पाच मजली असलेली ती इमारत शिवसेना भवन (Shivsena Bhavan) नाहीच, शिवसेना भवन आम्ही नवीन उभारू आणि जी शिवसेना भवन म्हणून इमारत उभी आहे, ती देखील लवकरच ताब्यात घेऊ, असं शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले.

Shivsena Bhavan At Aurangabad
Uddhav Thackeray : 'शिवसेना नाव चोरलं तरी, ठाकरे नाव चोरू शकत नाही'; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हल्लाबोल केला आहे. कोण शिरसाट आणि कोण जंजाळ यांचा त्याच्याशी काय संबंध? शिवसेना भवन उभारताना यांनीच काड्या केल्या होत्या. शिवसेना भवन उभे राहू नये यासाठी यांनी त्यावेळेस प्रयत्न केले. त्यांनी मागणी केली तरीही काही फरक पडणार नाही, असे ते म्हणाले.

महापालिकेने शिवाई सेवा ट्रस्ट या संस्थेला औरंगपुरा येथील नाल्यावरची जागा २०१२ मध्ये भाडेतत्त्वावर बांधण्यासाठी परवानगी दिली. ही पाच मजली इमारत १२२४ चौरस मीटर जागेवर उभारली असून, तेथे २२ व्यापारी गाळे आहेत. या इमारतीच्या भोगवटा प्रमाणपत्राचे प्रकरण २०१५-१६ मध्ये पुढे आले होते. त्यावेळी दंड आकारण्यावरून वादही झाला होता.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com