Uddhav Thackeray News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये आली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाने बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. ' शिवसेना नाव चोरलं तरी, ठाकरे नाव चोरू शकत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं. (Latest Marathi News)
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला जात आहे. पत्रकार परिषदेत टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्यांनी (शिंदे गट) पक्षाचं नाव चिन्ह चोरलं आहे. हा पूर्वनियोजित कट होता. शिवसेना नाव चोरलं तरी ठाकरे नाव चोरू शकत नाही. दिल्लीवाले देखील देऊ शकत नाही. अशीच परिस्थिती राहिली तर २०२४ ची निवडणूक शेवटची ठरू शकते'.
'मी एक कार्टून दाखवतो. हे कार्टून 'मीड डे' या वृत्तपत्रातून छापून आलं आहे .आम्ही परवानगी घेऊन सामनामध्ये छापणार आहे. त्यात घरफोडी केलेली आहे, दरोडा घातलेला आहे. यामध्ये दोन तृतीयांश चोरी झालेली आहे. मग बाकीची मालमत्ता पण तुझीच, असा संदेश या कार्टूनमध्ये आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
'निवडणूक आयोगाने (Election Commisson) ज्यापद्धतीने जो निर्णय दिला, तो चुकीचा आहे. उद्यापासून नियमित सुनावणी सुरु होईल. आम्ही अशी विनंती केली. घटनातज्ञ माझ्याशी बोललेत की आमदार अपात्र ठरवलेच पाहिजे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एवढ्या घाईने निर्णय का घेतला, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
'प्रशांत भूषण यांनी केस दाखल केली होती. त्या तीन वादग्रस्त आयुक्तापैकी एक निवडणूक आयुक्त वादग्रस्त आयोगावर आहेत. सर्वोच्च न्यायालय उद्यापासून सुनावणी घेत आहे. गुंतागुंती होईल म्हणून घाईने हा निर्णय झाला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.