Corporator Harassment Case: नगरसेविकेचा भररस्त्यात विनयभंग, रस्त्यात अडवून अश्लील हावभाव अन् शिवीगाळ; कोल्हापुरातील संतापजनक घटना

Case Registered Against Man for Harassing Kolhapur Corporator: कोल्हापुरात कचरा उचलला जात नसल्याच्या मुद्द्यावरून नगरसेविकेला रस्त्यात अडवून शिवीगाळ, अश्लील हावभाव आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. तानाजी जाधवविरोधात जुना राजवाडा पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
Corporator Harassment Case
Corporator Harassment Casesaam tv
Published On

रणजीत माजगावकर

प्रभागातील कचरा उचलला जात नसल्याच्या रागातून नगरसेविकेला रस्त्यात अडवून शिवीगाळ, अश्लील हावभाव आणि धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तानाजी आनंदराव जाधव याच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित नगरसेविका वैयक्तिक कामासाठी जात असताना जाधवने त्यांना रस्त्यात अडवलं. यावेळी नगरसेविका आणि त्यांच्या वडिलांना अर्वाच्च शिवीगाळ करून अश्लील हावभाव केले. तसंच ‘बघून घेतो’, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय. ‘प्रभागातील कामं व्यवस्थित करत नाही’, असं म्हणत त्याने शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद केलंय.

Corporator Harassment Case
Nagpur : नागपूर हादरले! चौथीच्या विद्यार्थिनीचा ट्युशनमध्ये विनयभंग; वर्गात एकटी असल्याचा फायदा घेतला अन्...

जाधवने प्रभागातील घंटागाडी अडवून सरकारी कामात अडथळा आणल्याचाही आरोप आहे. यापूर्वी सुमारे दोन महिन्यांपूर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास तो नगरसेविकेच्या घरी गेला होता. प्रभागात कचरा साचला असून तो दाखवण्यासाठी आताच्या आता माझ्यासोबत चला, असा आग्रह करत त्याने वारंवार मानसिक त्रास दिल्याचं तक्रारीत म्हटलंय.

Corporator Harassment Case
Accident News : भीषण दुर्घटना! चालू ऑर्केस्ट्रामध्ये घुसली भरधाव बस; ५ जणांचा जागीच मृत्यू

तसंच प्रभागात कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या महिलांचे जाधवकडून व्हिडिओ काढले जात असल्याची तक्रार आहे. व्हिडिओ काढू नका, कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करा, अशी मागणी महिलांनी केली. मात्र, त्यानंतरही व्हिडिओ काढण्याचा प्रकार सुरू राहिल्याने अनेक महिलांनी त्याच्याविरोधात नाराजी व्यक्त केली.

Corporator Harassment Case
Gold Rate Today : सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! १ तोळा सोने इतक्या रुपयांनी महागले; वाचा आजचे ताजे दर

या सर्व आरोपांवरून नगरसेविकेच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसांनी तानाजी जाधवविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com