महाराष्ट्रभर 'एफडीए'चा कारवाईचा धडका; 3 दिवसांत 2.11 कोटींचा गुटखा जप्त, 16 जण अटकेत

fda news : महाराष्ट्रभर 'एफडीए'चा कारवाईचा धडका लावलाय. 3 दिवसांत 2.11 कोटींचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
FDA action
FDA Saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

राज्यात अन्न व औषध प्रशासनाने 13 ते 15 जून 2026 दरम्यान राबविलेल्या विशेष धडक मोहिमेत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला तसेच संशयित आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांवर मोठी कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान तब्बल 2 कोटी 11 लाख 87 हजार 123 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईत 16 जणांना अटक, 4 आस्थापना सील आणि 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यातील विविध विभागांत ही मोहीम राबविण्यात आली. मुंबई, कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात गुटखा-पानमसाला विक्री, वितरण आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

83 लाखांचा गुटखा-पानमसाला जप्त एफडीएने तीन दिवसांत राज्यभरातील 15 आस्थापनांची तपासणी केली. त्यापैकी 14 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळून आले. या कारवाईत 83 लाख 41 हजार 821 रुपयांचा गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय.

अमरावती विभागात सर्वाधिक 70.92 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 जणांना अटक करण्यात आली. नागपूर विभागात 7.25 लाखांचा साठा जप्त करून 4 जणांना अटक करण्यात आली. कोकण विभागात 3.09 लाख, पुणे विभागात 1.57 लाख तर मुंबई विभागात 44 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

FDA action
तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

पोलिसांनी या प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चंद्रपुरात ‘मोक्का’ कारवाई

नागपूर विभागातील चंद्रपूरमध्ये गुटखा विक्री करणाऱ्या पाच जणांविरोधात बीएनएस कलम 111 अंतर्गत मोक्का लावण्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याकडून प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

1.28 कोटींचे अन्नपदार्थ जप्त

‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ या उपक्रमांतर्गत एफडीएने निकृष्ट दर्जाचे, असुरक्षित आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवरही कारवाई केली. राज्यातील 10 आस्थापनांवर छापे टाकून 1 कोटी 28 लाख 45 हजार 302 रुपयांचा 51,605 किलोहून अधिक अन्नसाठा जप्त करण्यात आला.

FDA action
तुकाराम मुंढेंकडून कारवाईचा धडाका; पानमसाला-गुटखा विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई, १०२ जण अटकेत

या कारवाईत सुपारी, खाद्यतेल, पिण्याचे पाणी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खवा, पेढे, तूप, गूळ, आंबा तसेच भेसळीसाठी वापरले जाणारे पदार्थ जप्त करण्यात आले. संबंधित नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. पुणे विभागात सर्वाधिक 1.17 कोटी रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. तर कोकण, मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com