अंगणवाड्यांमधील पोषण आहाराच्या गुणवत्तेवर FDAचे विशेष लक्ष
राज्यातील अंगणवाड्यांमध्ये दर महिन्याला अन्न व स्वच्छतेची तपासणी
गणेशोत्सवातील महाप्रसाद आणि भंडाऱ्यांमध्ये अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्यावर FDAची नजर
या मोहिमेचा प्रमुख उद्देश लहान मुलांना सुरक्षित व दर्जेदार पोषण आहार मिळवून देणे
अंगणवाड्यांमध्ये मुलांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी आता तुकाराम मुंढे सज्ज झालेत. FDAच्या रडारवर आता अंगणवाड्या आहेत, तर गणेशोत्सवातला महाप्रसादावरही FDAची नजर आहे. निकृष्ट पोषण आहारावर एका अंगणवाडी सेविकेनं सवाल उपस्थित केल्यानंतर आता अंगणवाड्या अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर आलेत. FDAनं अंगणवाड्यामध्ये दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराकडे आणि तिथल्या स्वच्छतेकडे आपलं लक्ष वळवलयं.
निकृष्ट दर्जाचे जेवण, भुंगे लागलेली कडधान्ये, खिचडीत आळ्या आढळणे आणि अन्नातील प्रचंड अस्वच्छता यांसारख्या गंभीर तक्रारींची दखल घेत एफडीने राज्यभर मोठ्या मोहिमेचा इशारा दिलाय. FDA आता दर महिन्याला राज्यातील अंगणवाड्यांमध्ये तपासणी मोहिम राबवणार आहे. जेणेकरून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा कुठलाच प्रकार घडणार नाही.
तर दुसरीकडे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद आणि भंडाऱ्याच्या आयोजनावरही एफडीएची नजर राहणार आहे. यापुढे FDAच्या परवानगीशिवाय महाप्रसाद आयोजित करणं मंडळांना महागात पडू शकतं.
मुळात महाप्रसादामुळे किंवा सामुहिक अन्न दानावेळी अन्नातून विषबाधेसारख्या दुर्दैवी घटना रोखण्यासाठी स्वच्छतेचा निकष पाळला जावा हाच यामागील मुख्य उद्देश आहे.. मात्र यामुळे नियम मोडून अन्नवाटप करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत. असं असलं तरी आता तुकाराम मुंढेंच्या मोहिमेमुळे मुलांना कागदावरचा नव्हे तर प्रत्यक्षात पौष्टीक आहार मिळण्याची आशा बाळगायला हरकत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.