MNS : राज ठाकरेंच्या उपस्थितीत ३ प्रसिद्ध मराठी कलाकारांचा मनसेत प्रवेश, राजकीय प्रवास सुरू

MNS Membership : मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे तीन कलाकार आता राजकीय प्रवास करताना दिसणार आहेत. प्रसिद्ध मराठी कलाकारांनी मनसेत प्रवेश केला.
MNS Membership
MNSsaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध मराठी कलाकारांनी मनसेत प्रवेश केला.

कलाकारांनी मनसेचे सभासदत्व स्वीकारले आहे.

कलाकारांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा(Maharashtra Navnirman Sena) 20वा वर्धापन दिन 9 मार्चला उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी ( Raj Thackeray) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच राज्यभरात सदस्य नोंदणीची मोहीम राबवण्याची सूचना केली. त्यानंतर अनेक मराठी कलाकारांनी मनसेत प्रवेश केला. मराठी मनोरंजनसृष्टीतील तीन मोठ्या कलाकारांनी मनसेचे सभासदत्व स्वीकारले आहे.

प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, तसेच दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्वाची नोंदणी केली. यावेळी या तिघांसोबत श्री.भरत दाभोळकर देखील होते. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, यावेळी मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि नेत्या शालिनी ठाकरेही उपस्थित होत्या.

मराठी कलाकार कायम राज ठाकरे यांना आणि मनसेला पाठिंबा देताना दिसतात. तसेच राज ठाकरे स्वतः कलाकारांना मदत करायला पुढे असतात. 19 मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे सभा घेणार आहे. या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणी फॉर्म्सवर सह्या केल्या.

भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, केदार शिंदे ही मराठी मनोरंजन इंडस्ट्रीतील खूप मोठी नावे आहेत. अलिकडेच केदार शिंदे दिग्दर्शित 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर भरत जाधव 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच पुष्कर श्रोत्रीचे 'श्शsss घाबरायचं नाही' हे नाटक सुरू आहे.

MNS Membership
Sanya Malhotra : सान्या मल्होत्राची स्वप्नपूर्ती! मुंबईत घेतले आलिशान घर; गृहप्रवेशाचे फोटो शेअर करून दिली गुडन्यूज, किंमत किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com