Sanya Malhotra Buys House
Sanya Malhotrasaam tv

Sanya Malhotra : सान्या मल्होत्राची स्वप्नपूर्ती! मुंबईत घेतले आलिशान घर; गृहप्रवेशाचे फोटो शेअर करून दिली गुडन्यूज, किंमत किती?

Sanya Malhotra Buys House : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राने मुंबईत स्वतःचे घर खरेदी केले आहे. गृहप्रवेशाचे सुंदर फोटो शेअर करून तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
Published on
Summary

अभिनेत्री सान्या मल्होत्राने मुंबईत घर घेतले.

सान्या मल्होत्राने गृहप्रवेशाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

मुंबईत समुद्रकिनारी अभिनेत्रीचे घर आहे.

मनोरंजनसृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सान्या मल्होत्राने (Sanya Malhotra) मुंबईत स्वतःचे हक्काचे घर खरेदी केले आहे. तिचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तिने नुकतेच गृहप्रवेशाचे सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. सान्या मल्होत्रा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सान्या मल्होत्रा फोटोंमध्ये पूजा करताना दिसत आहे. 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'दंगल' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. सान्या मल्होत्राचे नवीन घर समुद्रकिनारी आहे. तिच्या घरातून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये सान्या मल्होत्राचे कुटुंब आणि मित्रमंडळी पाहायला मिळत आहे. सान्याने गृहप्रवेश पूजेसाठी सुंदर पारंपरिक लूक केला. तिने खूप सुरेख साडी नेसली होती. अभिनेत्री खूपच आनंदी होती. तिने या पोस्टला खूप खास कॅप्शन दिलं आहे.

सान्या मल्होत्राची पोस्ट

"हर हर महादेव

स्वप्न पाहण्याचे, काम करण्याचे, शिकण्याचे आणि प्रगती करण्याचे वर्षे

या घराची प्रत्येक भिंत मला आठवण करून देईल की, संयम आणि श्रद्धेचे परिणाम किती सुंदर असू शकतो...

माझ्या कुटुंबाचा आणि मित्रांचा विश्वास नेहमीच माझी सर्वात मोठी ताकद आहे...

हे फक्त एका घरापेक्षा जास्त आहे...

हे माझ्या प्रवासाचा एक छोटासा भाग आहे...

माझ्या घरात आपले स्वागत..."

सान्या मल्होत्राच्या घराची किंमत किती?

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री सान्या मल्होत्राने मुंबईतील जुहू येथे 14.3 कोटी रुपयांना एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले. हे आलिशान अपार्टमेंट जुहू-वर्सोवा लिंक रोडवर आहे. घराचे इंटीरियर खूपच सुंदर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सान्या मल्होत्राची एकूण संपत्ती अंदाजे 40-60 कोटी रुपये आहे. चाहते आता सान्या मल्होत्राच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Sanya Malhotra Buys House
Zakir Khan : प्रसिद्ध कॉमेडियनची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील 'त्या' VIDEO मुळे चाहते चिंतेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com