राजकारणात मोठा उलटफेर, भरत जाधव यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री; राजकीय समीकरण बदलणार

bharat join ajit pawar ncp : नवी मुंबईच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. भरत जाधव यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री केली आहे.
ajit pawar navi mumbai
ajit pawar newsSaam tv
Published On
Summary

नवी मुंबईच्या राजकारणात मोठा उलटफेर

नवी मुंबईचे माज नगरसेवक भरत जाधव यांचा अजित पवार गटात प्रवेश

भरत जाधव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निकालानंतर साऱ्यांचं लक्ष आता महापालिका निवडणुकीकडे लागलं आहे. राज्यातील मुंबई, पुणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकींकडे साऱ्यांचं विशेष लक्ष असणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे अजित दादांच्या राष्ट्रवादीने नवी मुंबईतही जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसत आहे. या ऐन निवडणुकीत भरत जाधव यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ajit pawar navi mumbai
शिवसेनेचा बुरुज ढासळला; अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेत कमळ फुललं

नवी मुंबईत प्रामुख्याने भाजप आणि शिंदे गटाचं वर्चस्व पाहायला मिळतं. काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते संदिप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. संदिप नाईक यांच्या पक्षप्रवेशाने भाजपची ताकद वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेदरम्यानच भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भरत जाधव यांनी पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. भरत जाधव यांच्या पक्षप्रवेशाने नवी मुंबईतील समीकरण बदलणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिंदे गटाचा अजित पवारांना धक्का

दुसरीकडे नवी मुंबईत शिंदे गटानेही अजित पवारांना जोरदार धक्का दिला आहे. नेरुळ येथील अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नेरुळमध्ये एका मेळाव्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामुळेही नवी मुंबईतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ajit pawar navi mumbai
बारामतीत बसपाचा 'हत्ती' सुसाट; अवघ्या २१ वर्षांची तरुणी नगरसेवक बनली

वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार

बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका मनिषा पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांची साथ सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. पालिकेच्या निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.नालासोपारा विधानसभेचे भाजप आमदार राजन नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा वाढता कल पाहता हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर आता मोठे आव्हान निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली आगे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com