लोणावळ्याला फिरण्यासाठी चाललेल्या पर्यटकांना वाटेत अडवून, तुमच्या कारमध्ये गांजा आणि ड्रग्ज आहे अशी भीती घालत तोतया पोलिसांनी ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीणच्या कामशेत टाकवे पोलीस ठाण्यात ६ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MIM चे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यानी ही माहिती दिली.
पुण्यातील विमाननगर येथे राहणारे तक्रारदार भुषीत उमेष षर्मा हे त्यांचे मित्र मोहम्मद काषान आझमी, मित्राची पत्नी फायझा जमिल (वय २७), आणि मेहुणे सय्यद जुबेर अहमद यांच्यासोबत ५ जुलै २०२६ रोजी दुपारी कारने लोणावळ्यातील मॅप्रो गार्डन येथे फिरण्यासाठी निघाले होते. कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका झायलो कारमधून आलेल्या ६ अज्ञात इसमांनी तक्रारदारांची कार अडवली. आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करत त्यांनी गाडीची तपासणी सुरू केली.
तपासणी दरम्यान तक्रारदाराच्या मित्राकडे AMBER LEAF कंपनीचे सिगारेटचे पाकीट सापडले. याचाच बहाणा करून, तुमच्या कारमध्ये गांजा आणि ड्रग्ज काढून द्या, नाहीतर कारवाई करावी लागेल. पोलीस कारवाई टाळायची असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी या तोतया पोलिसांनी दिली. पैसे उकळण्याच्या उद्देशाने आरोपींनी तक्रारदार व त्यांच्या मित्रांना त्यांच्याच कारमध्ये बसवून एटीएम (ATM) मधून पैसे काढण्यासाठी तळेगाव येथे नेले. मात्र, तळेगाव येथे पोहोचल्यावर तक्रारदार आणि त्यांचे मित्र पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोपींच्या लक्षात आले.
गुन्हा उघडकीस येण्याच्या भीतीने, कारमध्ये बसलेले दोन आरोपी तातडीने उतरले आणि स्वतःच्या झायलो कारमध्ये बसून इतर साथीदारांसह तिथून पसार झाले. ६ जुलै २०२६ रोजी पहाटे ५:२६ वाजता कामशेत टाकवे पोलीस ठाण्यात या घटनेची रीतसर नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी ६ अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.