Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

ASHOK KHARAT HAWALA RACKET EXPOSED: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अशोक खरात मुंबईतून हवाला रॅकेट चालवत होता. पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याच्या नावाने महिनाभर रुम बुक करण्यात आली होती.
Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट
Ashok KharatSaam Tv
Published On

Summary -

  • पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवल्याचा आरोप

  • सीएच्या नावावर वर्षभरासाठी महागडी रूम बुक

  • कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात

  • ईडीच्या चौकशीची शक्यता, राजकीय संबंधांची तपासणी

भोंदू खरातच्या हवाला रॅकेटबाबत नवी माहिती समोर आलीय... खरात मुंबईतून हवाला रॅकेट कसं चालवायचा ? या रॅकेटमध्ये खरातला कोण मदत करत होतं? खरातच्या सीएनं पंचतारांकित हॉटेलमधील रुम 365 दिवसांसाठी का बुक केली होती ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

अध्यात्माच्या नावाखाली कोट्यवधींची माया जमवणाऱ्या अशोक खरातचे धागेदोरे आता थेट पंचतारांकित हॉटेलपर्यंत पोहोचलेत. मुंबईत कोट्यवधीचं भाडं भरून खरात आलिशान हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवत असल्याचं उघड झालंय.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट
Ashok Kharat: मोठी बातमी! अटकेच्या आधी भोंदूबाबा खरातची 3 IAS अधिकाऱ्यांसोबत बैठक? पाहा VIDEO

खरातच्या सीएच्या नावावर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विशेष रुम बुक असायची. या हॉटेलमध्ये बाराही महिने सीएसाठी रूम राखीव असायची. या पंचतारांकित रूमचं एका दिवसाचं भाडं 20 ते 25 हजार रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे...याच आलिशान रुममध्ये खरातच्या उपस्थितीत दिग्गज राजकीय नेते, उद्योजकांच्या बैठका होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे याच रूममधील कोट्यावधींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आणि हवाला रॅकेटचा तपास सुरु आहे.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट
Kharat Case : त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही...भोंदू अशोक खरातवरून विधानसभेत खडाजंगी, कोण काय म्हणालं? VIDEO

विशेष म्हणजे या हॉटेलच्या रुमसाठी एक कोटीहून अधिक भाडं खरात नेमकं का भरत होता ? याचा तपास यंत्रणांकडून शोध सुरु आहे. आधीच दुबईतील सराफामार्फत खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आलेली असताना या नव्या माहितीनं खरात ईडीच्या रडारवर आलाय. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच खरातची ईडी चौकशी होणार असल्याची माहिती दिलीय.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट
Ashok Kharat Case : अशोक खरातच्या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन? मोबाईलमधून बाहेर येणार खरातची 'कुंडली', वाचा खास रिपोर्ट

दरम्यान खरात मुंबईतील ज्या हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवायचा. त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार का? खरातला भेटायला येणारे 'ते' दिग्गज नेते आणि उद्योजक कोण होते? सीएच्या माध्यमातून चालणाऱ्या या व्यवहारांची मूळं कुठं आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तपासातून समोर येणं गरजेचं आहे.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट
Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणातील दोषींवर काय कारवाई होणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com