Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

Nagpur explosives seizure : नागपूरमध्ये संघ मुख्यालयाजवळ स्फोटकांनी भरलेली बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. 15 जिलेटिन कांड्या आणि 58 डिटोनेटर जप्त करण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे.
Nagpur explosives seizure
Nagpur explosives seizureSaam TV Marathi
Published On

explosives found near RSS headquarters Nagpur details दिल्लीमधील दहशतवादी कटाचं मुंबई कनेक्शन समोर आलं असतानाच नागपूरमध्ये संवेदनशील भागात स्फोटकं आढळली आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पाहूया एक रिपोर्ट...

राजधानी दिल्ली उडवून लावण्याचा दहशतवाद्यांचा कट एटीएसने उधळून लावल्याची घटना ताजी असतानाच नागपुरात संवेदनशील परिसरात स्फोटकं आढळल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. शहरातील गजबजलेल्या सीए रोडवरील दोसर भवन चौकात जिवंत स्फोटकं आढळली आहेत. गंभीर बाब म्हणजे मेट्रो स्टेशन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परीसरातील एका घरासमोर स्फोटकांची बॅग आढळली आहे.

या बॅगेत तब्बल 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आहेत. घरमालक उज्वल लांजेवार यांच्या घराशेजारी ही बॅग होती. गंभीर बाब म्हणजे गेल्या दीड महिन्यांपासून बॅग तिथेच पडून होती. लांजेवार यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपासणी केली असता त्यात डिटोनेटर आणि जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. या घटनेनेंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून सर्व स्फोटके सुरक्षित स्थळी हलवली. संबंधित स्फोटके तपासण्यासाठी ‘पेसो’ तसेच फॉरेन्सिकची पथकेदेखील दाखल झाली आहेत.

Nagpur explosives seizure
Ladki Bahin Yojana : मे महिन्यापासून 'या' लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद, तुमचं नाव तर नाही ना?

स्फोटकांनी भरलेली ही बॅग काटोल येथील एस. बी. एल. कंपनीतील असल्याचे सांगितले जात आहे. ज्या दोसर भवनाजवळ ही स्फोटके सापडली तिथून काही अंतरावरच पोद्दारेश्वर राम मंदिर आणि मोमिनपुरा आहे. रामनवमीला याच परिसरातून शोभायात्रा निघाली होती. दुसरीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर स्फोटकांची कारखाने आहेत. त्यातीलच एखाद्या कारखान्यातील ही स्फोटके आहेत का? संबंधित स्फोटके विहीर खोदणे किंवा खाणकामासाठी वापरली जाणार होती की त्यामागे घातपाताचा कट होता ? हे आता तपासाअंतीच समोर येईल.

पराग ढोबळे, साम टीव्ही, नागपूर

Nagpur explosives seizure
IAS transfers : महाराष्ट्राच्या प्रशासनात 'बदली' वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com