Ladki Bahin Yojana : मे महिन्यापासून 'या' लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद, तुमचं नाव तर नाही ना?

Ladki Bahin Yojana benefit stop May 2026 eligibility rules : लाडकी बहीण योजनेचा १५०० रुपयांचा लाभ मे 2026 पासून अनेक महिलांचा बंद होण्याची शक्यता आहे. ईकेवायसी पूर्ण केली आहे का? लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का, हे लगेच तपासा.
Ladki Bahin Yojana benefit stop May 2026 eligibility rules
Ladki Bahin Yojana benefit stop May 2026 eligibility rulesSaam TV Marathi
Published On

how to check Ladki Bahin beneficiary list online Maharashtra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १५०० रूपयांचा लाभ काही महिलांचा बंद होणार आहे. होय.. १ मे २०२६ पासून अपात्र महिला अथवा ई केवायसी न केलेल्या महिलांचा १५०० रूपयांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून याबाबतचे संकेत दिले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीसाठी शेवटची संधी दिली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ई केवायसी दुरूस्तीसाठी सरकारकडून ३० एप्रिल ही शेवटची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जर ईकेवायसी केली असेल, अन् त्यामध्ये काही चूक असेल तर आताच दुरूस्ती करून घ्या.. अन्यथा पुढील महिन्यापासून तुमचा १५०० रूपयांचा लाभ बंद होईल.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना आणली होती. अल्पावधीतच या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. कोट्यवधि महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. पण सरकारकडून त्यासाठी सरकारकडून काही अटी टाकण्यात आल्या होत्या. राज्यातील काही महिलांनी निकषात नसतानाही अर्ज केला अन् प्रत्येक महिन्याला या योजनेचा लाभ घेतला. यामुळे सरकारला आतापर्यंत कोट्यवधींचा फटका बसला आहे. पण आता सरकारकडून ईकेवायसी करून पडताळणी सुरू करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पहिल्या टप्प्यात सरकारने ईकेवायसी केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दुरूस्तीची संधी दिली होती. पण आता पु्न्हा एकदा एक महिन्याचा वेळ सरकारने वाढवला आहे. आता ३१ एप्रिल ही अखेरची तारीख सरकारकडून देण्यात आली आहे. पण फक्त ही संधी दुरूस्तीसाठीच मिळाली आहे. नव्याने ईकेवायसी करता येणार नाही.

Ladki Bahin Yojana benefit stop May 2026 eligibility rules
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे ₹१५०० येणार की नाही? ५ मिनिटांत तुम्हीच करा चेक

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया करताना चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थींना दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. ज्या महिलांनी ईकेवायीस केली नाही त्यांचा लाभ कायमचा बंद होणार नाही. किंवा ईकेवायसी चूक दुरूस्त केली नाही, त्यांचाही लाभ बंद होणार नाही. ज्या महिलांनी ईकेवासी केलेली आहे, पण त्या निकषात बसत नाही त्यांचाही लाभ मे महिन्यापासून बंद होणार आहे, याबाबतची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

Ladki Bahin Yojana benefit stop May 2026 eligibility rules
New Labour Code : ₹60 हजार CTC असणाऱ्यांना किती मिळणार In-Hand Salary? समजून घ्या Calculation

मिळालेल्या माहितीनुसार, ७० लाख महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. पण त्यात तुमचे नाव तर नाही ना? ladakibahin.maharashtra.gov.in या सरकारी संकेतस्थळावर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही? हे तपासता येईल. त्यासाठी त्या संकेतस्थळावर आधी लॉगइन करा. त्यानंतर मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाका. ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर लाभार्थी यादी अथवा अर्जाची स्थिती, या पर्यायावर जा.. आधार क्रमांक अथवा अर्ज क्रमांक टाकल्यानंतर तुम्ही लाभार्थीच्या यादीत आहात की नाही? हे समजणार आहे.

Ladki Bahin Yojana benefit stop May 2026 eligibility rules
डासांसाठी तुम्ही वापरत असलेल्या २ अगरबत्त्या कायमच्या बंद, राज्य सरकारने कारखान्याला लावले कुलूप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com