डासांसाठी तुम्ही वापरत असलेल्या २ अगरबत्त्या कायमच्या बंद, राज्य सरकारने कारखान्याला लावले कुलूप

mosquito repellent ban : महाराष्ट्र सरकारने घातक रसायनांचा वापर करणाऱ्या ‘कम्फर्ट’ आणि ‘स्लीप वेल’ डास अगरबत्तीवर बंदी घातली आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही मोठी कारवाई करण्यात आली असून दोषींवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
Mosquito Coil CIR Number
Mosquito Repellent Safetygoogle
Published On

Maharashtra mosquito incense ban Comfort Sleep Well reason : महाराष्ट्र सरकारने राज्यभरात अनधिकृत रसायनांपासून बनवलेल्या डास प्रतिबंधक अगरबत्ती विरोधात मोठी कारवाई केली. कम्फर्ट आणि स्लीप वेल या डास अगरबत्तीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. राज्य सरकारकडून विक्रेत्यांना कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सरकारकडून ठाण्यातील कारखाना बंद करण्यात आला आहे.

नागरिकांची सुरक्षा अवैध उत्पादनांचा प्रसार रोखणे, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. याबाबत कृषी विभागाने सर्व अधिकाऱ्यांना कडक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र कृषी संचालकांनी सर्व विभागीय कृषी सहसंचालकांना आणि कीटकनाशक निरीक्षकांना एक नवीन परिपत्रक जारी केले आहे.

Mosquito Coil CIR Number
PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

कम्फर्ट आणि 'स्लीप वेल' ब्रँडच्या अगरबत्तीमध्ये डायमेफ्लुथ्रिन आणि मेपरफ्लुथ्रिन सारखी कीटकनाशक रसायने आढळली आहेत. त्यामुळे अगरबत्ती म्हणून वापरण्यास मान्यता नाही. यामध्ये कीटकनाशक कायदा, १९६८ आणि कीटकनाशक नियम, १९७१ अंतर्गत तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांना छापे टाकून अवैध साठा जप्त करण्याचे आणि दोषी उत्पादक, वितरक व किरकोळ विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Mosquito Coil CIR Number
New Labour Code : सुट्टी घेतलीच नाही? आता मिळणार पैसे, नवीन कर्मचारी कायदाचा फायदाच फायदा, वाचा

सर्व अहवाल थेट आयुक्तालयाकडे पाठवले जातील. परिपत्रकात असेही म्हटले आहे की, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कारवाईचे अहवाल थेट कृषी आयुक्तालयाकडे सादर करावेत. यामुळे राज्यभरात एकसमान आणि वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित होईल. ठाण्यातील 'कम्फर्ट' ब्रँडविरुद्ध यापूर्वी झालेल्या कारवाईनंतर ही कारवाई करण्यात आली. आशा अगरबत्यांमुळे मानवी आरोग्य धोक्यात येऊ शकते. कारवाई केल्यानंतर यातील काही नमुने महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये तपासण्या आणि प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या चाचण्यांमधून हे सिद्ध झाले आहे की, या अगरबत्तीमध्ये मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकणारी रसायने आहेत. या तपासणीत असेही उघड झाले की, ही उत्पादने कोणत्याही मंजूरीशिवाय विकली जात होती, ज्यामुळे ग्राहकांमध्ये त्यांच्या सुरक्षिततेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. बेकायदेशीर आणि अप्रमाणित रसायनांचा गैरवापर सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतो. आशा रसायनामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशी माहिती कृषी विभागाचे अधिकारी यांनी दिली.

Mosquito Coil CIR Number
प्राजक्त तनपुरेंना तिकिट का नाही? राष्ट्रवादी काँग्रेसनं एका वाक्यात विषय संपला, शिंदेंनी काय सांगितले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com