प्राजक्त तनपुरेंना तिकिट का नाही? राष्ट्रवादी काँग्रेसनं एका वाक्यात विषय संपला, शिंदेंनी काय सांगितले?

Prajakta Tanpure withdrawal Rahuri political reasons : महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका आता बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत रंगणार आहे.
Prajakt Tanpure
Prajakt TanpureSaam tv
Published On

Prajakta Tanpure NCP candidate selection Rahuri by-election : महाराष्ट्रात होत असलेल्या बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाहीत, यावर आज शिक्कामोर्तब झालेय. राहुरीमध्ये भाजपकडून अक्षय कर्डीले तर बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. राहुरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोविंदराव कोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बारामतीत काँग्रेसने आपला उमेदवार उतरवला आहे. राहुरीमध्ये माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेवटच्या अर्ध्या तासात गोविंदराव मोकाटे यांना उमेदवारी दिली. प्राजक्त तनपुरे यांनी माघार का घेतली? राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोकाटे यांनाच उमेदवारी का दिली? याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. राहुरी पोटनिवडणुकीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. प्राजक्त तनपुरे यांनी माघार का घेतली? याबाबत त्यांनी माहिती दिली. (Prajakta Tanpure withdrawal Rahuri political reasons)

गोविंदराव मोकाटे यांच्याशिवाय आणखी २ जणांकडून आमच्याकडे राहुरीसाठी उमेदवारी मागितली होती. प्राजक्त तनपुरे यांनी दुपारी एक वाजता माघार घेतल्याचे समजले, त्यावेळी आम्ही मोकाटे यांना उमेदवारी धरली. प्रजक्त तनपुरे यांनी पक्षाला वेटीस धरले नाही. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचा निरोप पक्षाला दिला होता. त्यांनी माघार घेतली असेल पण आपण उमेदवार दिला आहे, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे म्हणाले.

Prajakt Tanpure
प्राजक्त तनपुरेंची माघार, शरद पवारांनी शेवटच्या अर्ध्या तासात सूत्रे फिरवली, राहुरीत या शिलेदाराला दिली उमेदवारी

प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत दुपारी १ वाजेपर्यंत चर्चा केली. त्यांनी माघार घेतल्यानंतर आम्ही गोविंदराव मोकाटे यांना उमेदवारी दिली. प्राजक्त तनपुरे यांनी पक्षाला वेटीस धरलेले नाही. त्यांची पहिल्यापासूनच राहुरी पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर त्यांनी तयारी केली होती. पण आज त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे निश्चित केले. पहिल्यापासूनच त्यांनी निवडणूक लढवण्याची मानसिकता नव्हती. त्यांनी माघार घेतल्यानंतर मविआकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली, असे शशिकांत शिंदे म्हणाले.

Prajakt Tanpure
सुनेत्रा पवारांच्या विरोधात २० पेक्षा जास्त अर्ज, एकनाथ शिदेंकडून पहिली प्रतिक्रिया, थेट बारामतीकरांना म्हणाले...

प्राजक्त तनपुरे भाजपच्या नेत्यांकडे कोणतीही बोलणी करण्यासाठी गेले नव्हते. तर भाजपचे दिग्गज नेते त्यांच्याकडे आले होते. पोटनिवडणुकीत अर्ज भरू नका, अशी भाजप नेत्यांनी केल्याचे मला समजतेय, असे शिंदे म्हणाले. प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार का घेतली? त्यांच्यावर कोणता राजकीय दबाव होता का? याबाबत मला कोणतीही माहिती नाही, असे शशिकांत शिंदे म्हणाले. राहुरीमध्ये आता अक्षय कर्डीले आणि गोविंदराव मोकाटे, अशी थेट लढत होणार आहे. पण प्राजक्त तनपुरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यांनी निवडणुकीत माघार घेण्याचा निर्णय घेतला असेल तर पण त्यांचा पाठिंबा कुणाला मिळेल, त्यावरच राहुरीचा उमेदवार ठरणार असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

Prajakt Tanpure
Congress controversy : 'तुझा ब्लाऊज फाड...' काँग्रेस नेत्याची जीभ घसरली; व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com