C P Mathew speech controversy details Kerala election : पश्चिम बंगाल, केरळसह देशातील ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडालाय. निवडणूक प्रचारात एका सभेला संबोधित करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली. केरळमध्ये प्रचारादरम्यान काँग्रेस नेत्याने निवडणुकीसाठी महिलांचा वापर करत असल्याचा आरोप करत असताना आक्षेपार्ह वक्तव्य केलेय. काँग्रेसच्या माजी महिला उपसरपंचाला विरोधकांना त्रास देण्यासाठी ब्लाऊज फाडण्याचे वक्तव्य केलेय. केरळमध्ये प्रचार करत असताना सीपी मॅथ्यू यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेय. मॅथ्यू यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याने केरळमधील विधानसभा निवडणुकीतील प्रचार आणखी तापलाय.
केरळमधील इडुक्की जिल्हा काँग्रेस समितीचे प्रमुख सी. पी. मॅथ्यू यांनी एका महिला कार्यकर्त्याबद्दल कथितरित्या आक्षेपार्ह वक्तव्य केले. इडुक्की मतदारसंघातील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (UDF) उमेदवार रॉय के. पॉलोस यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत. स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मॅथ्यू यांनी आपल्या भाषणात जुन्या आंदोलनाचा उल्लेख केला. राजकीय विरोधकांना त्रास देण्याच्या निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी एका ग्रामपंचायतीच्या माजी महिला उपसरपंचाला ब्लाउज फाडण्याचा सल्ला दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल -
सी. पी. मॅथ्यू यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायर झाला आहे. या व्हिडिओत ते म्हणतात की, 'महिला नेता कोणत्या वादावेळी आपले कपडे स्वत: फाडू शकते आणि पोलिसात तक्रारही करू शकते.' मॅथ्यू यांच्यामते, अशा डावपेचांमुळे राजकीय विरोधकांविरुद्धचे खटले अधिक मजबूत होतात.
मॅथ्यू यांनी भाषण करत असताना ती महिला आदिवासी समुदायाची असल्याचे म्हटलेय. त्यामुळे गरज पडल्यास इतर कलमेही लागू केली जाऊ शकतात, असेही ते म्हणाले. मॅथ्यू यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अनेक नेत्यांना हसू आवरले नसल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. मॅथ्यू यांच्याकडून हे वादग्रस्त वक्तव्य केले त्यावेळी स्टेजवर केरळ काँग्रेसचे उपाध्यक्ष जेसन जोसेफ यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेस नेतृत्वाने अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मॅथ्यू यांच्या या वक्तव्याने केरळच्या विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.