Devendra Fadnavis: गिरीश महाजनांवर गुन्हे दाखल करण्यासाठी देशमुख यांचा एसपींवर दबाव; फडणवीसांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis: गिरीश महाजन यांच्यावर गुन्हे दाखल केल्याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
Devendra Fadnavis: गिरीश महाजनांवर गुन्हे दाखल करण्यासाठी देशमुख यांचा एसपींवर दबाव; फडणवीसांचा गंभीर आरोप
Devendra Fadnavis
Published On

भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून घेण्यासाठी अनिल देशमुख यांनी एसपींवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. सीबीआयने जी चार्जशिट दाखल केलीय. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितला आहे की गिरीश महाजन यांचा खोटे गुन्हे दाखल करा असं म्हटलंय. अनिल देशमुखांच्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांच्याविरोधातील पुरावे आपल्याकडे दिल्याचा गौप्यस्फोटही फडणवीस यांनी केला. यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महाजन यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारदाराची तक्रार नोंदवून घ्या, असे आदेश अनिल देशमुखांनी जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना दिले होते. पण हा गुन्हा जळगावच्या हद्दीत नाही, त्यामुळे पुण्यात हा गुन्हा नोंदवावा, अशी भूमिका प्रवीण मुंडेंनी घेतली. परंतु गृहमंत्री अनिल देशमुखांनी गुन्हा नोंदवून घ्यायला भाग पाडल्याचा आरोप करण्यात आलाय.

प्रवीण मुंडेंनी याबाबतची कबुली सीबीआयला दिलीय. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर बोलतांना देशमुखांवर गंभीर आरोप केलेत. देशमुख यांच्याविरोधातील ऑडिओ पुरावे मी स्वतः सीबीआयकडे दिले होते. त्यानंतर केस दाखल झाली होती. सीडी आणि पुराव्यासकट चार्जशीट दाखल केली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय आहे प्रकरण

जळगावमधील एका शिक्षण संस्थेमधील बोर्डवर गिरीश महाजन संचालक होते. त्या शिक्षण संस्थेचा ताबा कुणाकडे असावा, यावरुन वाद झाला. यात गिरीश महाजन यांनी इतर संचालकांवर दबाव आणल्याचा आरोप होता. याप्रकरणात गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी जळगावमध्ये जाऊन तपास केला. तेव्हा तत्कालीन अनिल देशमुखांनी एसपी प्रवीण मुंडे यांच्यावर गु्न्हा नोंदवण्यासाठी दबाव आणल्याचा दावा एसपी मुंडे यांनी केल्याचं सीबीआयकडून सांगण्यात आलं आहे.

Devendra Fadnavis: गिरीश महाजनांवर गुन्हे दाखल करण्यासाठी देशमुख यांचा एसपींवर दबाव; फडणवीसांचा गंभीर आरोप
Manoj Jarange Patil: मराठ्यांनो, तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत भाजपची एकही जागा निवडून येऊ देऊ नका; मनोज जरांगेंचं आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com