विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यावरुन झालेला वाद चांगलाच तापला आहे. सोमवारी गडावर झालेल्या तोडफोडीनंतर जिल्ह्यात तणाग्रस्त स्थिती आहे. त्यावर आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशाळगडावरील अतिक्रमणावर कोणत्याही परिस्थिती कारवाई होणारचं. विशाळगडावरील अतिक्रमण हटवलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची मागणी होती. मात्र अतिक्रमण हटवताना ते कायदेशीर पद्धतीने झालं पाहिजे, असं म्हटलं आहे.
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून नमो एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे. या कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नियोजन केलेल्या या नमो एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. या एक्सप्रेसच्या माध्यमातून वारकरी व भाविकांना मुंबई ते पंढरपूर व पंढरपूर ते मुंबई असा मोफत प्रवास करता येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड परिसरात तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
संभाजीराजे छत्रपती विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी रविवारी 'चलो विशाळगडचा नारा' दिला होता. शिवभक्तांसह ते विशाळगडावर गेले होते. अज्ञातांनी विशाळगडच्या पायथ्याला असणाऱ्या काही गावांमध्ये धुडगूस घातला. यावेळी काही अज्ञातांनी स्थानिकांवर हल्ला केला होता. त्यांच्यावर दगडफेक केली, घरांची तोडफोड केली तसंच वाहनांची देखील तोडफोड केली होती. त्यावरून आज पत्रकारारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवलंच पाहिजे, मात्र ते कायदेशीर, कोणीही कायदा होतात घेऊ नये, असं म्हटलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.