Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, संपर्कप्रमुखांनी धनुष्यबाण सोडला; शेकडो कार्यकर्त्यांसह केली घरवापसी

Jalgaon Nilesh Patil latest news : जळगावमध्ये शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा संपर्कप्रमुख निलेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Jalgaon Nilesh Patil latest news
Jalgaon Nilesh Patil latest newsSaam TV
Published On: 

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यात महायुतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेना (शिंदे गट) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख निलेश पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार अनिल पाटील, लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Jalgaon Nilesh Patil latest news
Weather : आंध्रच्या किनाऱ्याला धडकणार चक्रीवादळ, महाराष्ट्रातील 'या' भागात धो-धो पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा नवा इशारा

नाराजीचे कारण काय?

पक्ष सोडताना निलेश पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. शिवसेनेत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना बोलावले जात नव्हते, असा आरोप त्यांनी केला. तसेच, महापालिका निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःच्या मातोश्रींच्या विरोधात काम केल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली; याच राजकीय कटूतेमुळे आणि नाराजीतून आपण अखेर शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्याचे निलेश पाटील यांनी स्पष्ट केले.

Jalgaon Nilesh Patil latest news
पुणे हादरले! भरवस्तीतून १८ वर्षांच्या तरुणीला उचलून नेहण्याचा प्रयत्न; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

निलेश पाटलांची राजकीय पार्श्वभूमी

निलेश पाटील यांनी २००९ ते २०१७ या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले असून, या काळात त्यांनी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष आणि महानगर अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर २०१७ ते २०२३ या काळात त्यांनी शिवसेना मध्ये प्रवेश करून जिल्हाप्रमुख आणि नंतर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून महत्त्वाची पदे भूषवली होती. आता त्यांनी पुन्हा आपल्या मूळ पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये पुनरागमन केले आहे.

Jalgaon Nilesh Patil latest news
Ashok Chavan : अशोक चव्हाण भाजपसोडून काँग्रेसमध्ये घरवापसी करणार का? नाना पटोलेंच्या वक्तव्याने विषय संपला

मंत्री गुलाबराव पाटलांची मिश्किल प्रतिक्रिया

या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी अगदी मोजक्या शब्दांत, "चांगले आहे, ते शेवटी आमच्या मित्रपक्षातच गेले आहेत. त्यामुळे त्यांना शेवटी आमचाच प्रचार करायचा आहे," असे म्हणत या पक्षांतरावर फारशी खंत व्यक्त केली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com