Shivsena Dasara Melava: गेल्यावर्षी आम्ही माघार घेतली, पण यंदा... दसरा मेळाव्यावरुन शिंदे गटाच्या आमदाराचा थेट इशारा

Mla Sanjay Gaikwad News: मागण्याच्या वर्षी कोर्टाने ठाकरे गटाला झुकते माप दिले होते. मात्र, यावेळी आम्ही सर्वात अगोदर अर्ज केला आहे, असंही संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
Eknath Shinde Group Buldhana mla sanjay Gaikwad warns uddhav thackeray group on Dasara melava
Eknath Shinde Group Buldhana mla sanjay Gaikwad warns uddhav thackeray group on Dasara melavaSaam TV

संजय जाधव, साम टीव्ही

Mla Sanjay Gaikwad on Shivsena Dasara Melava

खरी शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार आमच्याकडेच आहे. त्यामुळे यंदा शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कावरच होणार, असा दावा शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार संजय गायकवाड यांनी केला आहे. मागण्याच्या वर्षी कोर्टाने ठाकरे गटाला झुकते माप दिले होते. मात्र, यावेळी आम्ही सर्वात अगोदर अर्ज केला आहे, असंही संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde Group Buldhana mla sanjay Gaikwad warns uddhav thackeray group on Dasara melava
OBC Reservation News: तब्बल २१ दिवसानंतर ओबीसींचं उपोषण मागे; देवेंद्र फडणवीसांनी काय आश्वासन दिलं?

आमचा हक्क आम्ही सोडणार नाही, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दुखवू नये म्हणून मागच्या वर्षी आम्ही दोन पावले मागे आलो होतो. मात्र, आता ते पूर्णपणे काँग्रेसवासी झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिवतीर्थाचे पावित्र्य नष्ट होणार, असा टोलाही संजय गायकवाड यांनी लगावला आहे.

गेल्यावर्षी आम्ही माघार घेतली, पण यंदा नाही, असा इशारा देखील आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. संजय गायकवाड यांच्या या इशाऱ्यामुळे पुन्हा ठाकरे आणि शिंदे गटात वाद होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत फूट (Eknath Shinde) पडल्यानंतर गेल्यावर्षी दोन्ही गटांकडून शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज करण्यात आले होते. यानंतर बराच वाद झाला होता. ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाने दसरा मेळाव्या घ्यायला ठाकरेंना परवानगी दिली होती.

तर शिंदे गटाने दुसरीकडे मेळावा घ्यावा, असं कोर्टाने म्हटलं होतं. त्यामुळे ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्क तर शिंदेंचा मेळावा बीकेसी येथे झाला होता. दरम्यान, गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दोन्ही गटांनी शिवाजी पार्क दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केले आहेत.

मात्र, यावर्षी आम्हीच सर्वात आधी अर्ज केला असून शिवतीर्थावर आमचाच दसरा मेळावा होईल, असा दावा शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे यंदा शिंदे की ठाकरे? शिवाजी पार्कावर कोणाचा आवाज घुमणार? याकडे मुंबईकरांसह महाराष्ट्राच्या नजरा असतील.

Edited by - Satish Daud

Eknath Shinde Group Buldhana mla sanjay Gaikwad warns uddhav thackeray group on Dasara melava
Political News: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी; महाराष्ट्रातील ७ आमदारांना खासदारकीचं तिकीट देणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com