BJP's big plan for Lok Sabha 2024 elections Seven MLAs from Maharashtra will be given Lok Sabha tickets
BJP's big plan for Lok Sabha 2024 elections Seven MLAs from Maharashtra will be given Lok Sabha ticketsSaamtv

Political News: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी; महाराष्ट्रातील ७ आमदारांना खासदारकीचं तिकीट देणार?

Lok Sabha Election 2024: एकीकडे महाविकासआघाडीने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्लान आखला असताना, दुसरीकडे भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मोठी खेळी खेळली आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजप तसेच महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहे. एकीकडे महाविकासआघाडीने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्लान आखला असताना, दुसरीकडे भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मोठी खेळी खेळली आहे. (Latest Marathi News)

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोठा प्लान आखला आहे. या प्लाननुसार भाजप चक्क लोकप्रिय आमदारांनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यावेळची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची तसेच लक्षवेधी ठरणार आहे.

BJP's big plan for Lok Sabha 2024 elections Seven MLAs from Maharashtra will be given Lok Sabha tickets
Shivsena News: मोठी बातमी! राहुल नार्वेकरांविरोधात ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात

काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP Maharashtra) चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात भाजपच्या मिशन 45 बद्दल माहिती दिली होती. लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असेल, असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं. आता याच फॉर्म्युल्यासाठी भाजपने मोठा प्लान आखला आहे.

आगामी लोकसभेसाठी (Lok Sabha Election) भाजपने विद्यमान खासदारांना तिकीट देतानाच राज्यातील ७ ते ८ आमदारांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील लोकप्रिय आमदारांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आदेश सुद्धा पक्षश्रेष्ठींनी या आमदारांना दिले असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्यातील महत्त्वाचे आणि लोकप्रिय आमदार आता लोकसभेत दिसण्याची चिन्हे दिसत आहेत.

या आमदारांना मिळू शकतं खासदारकीचं तिकीट

भाजपचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार, संकटोमोचक गिरीश महाजन, आमदार आकाश फुंडकर, रवींद्र चव्हाण, संजय केळकर आणि राम सातपुते या आमदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत खासदारकीचं तिकीट मिळणार असल्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Edited by - Satish Daud

BJP's big plan for Lok Sabha 2024 elections Seven MLAs from Maharashtra will be given Lok Sabha tickets
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाणार? येत्या ६ ऑक्टोबरला काय होणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com