Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाणार? येत्या ६ ऑक्टोबरला काय होणार?

Sharad Pawar Vs Ajit Pawar: निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाणार, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.
Will NCP clock symbol be frozen Ajit Pawar Sharad Pawar Latest Maharashtra Politics Updates
Will NCP clock symbol be frozen Ajit Pawar Sharad Pawar Latest Maharashtra Politics UpdatesSaam TV
Published On: 

Sharad Pawar Vs Ajit Pawar Latest News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद कोर्टात पोहचला. यानंतर निवडणूक आयोगाने ठराविक कालावधीसाठी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं होतं.

अशीच परिस्थिती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर देखील येण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाणार, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. (Latest Marathi News)

Will NCP clock symbol be frozen Ajit Pawar Sharad Pawar Latest Maharashtra Politics Updates
Tehsildar Post: तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरणार; तरुणांच्या हितासाठी काँग्रेसचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

येत्या ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी घेणार आहे. या सुनावणीदरम्यान राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाणार, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

दरम्यान, घड्याळ चिन्ह गोठल्यास शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटाला नवीन पर्यायी चिन्हांचा शोध घ्यावा लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार आणि अजित पवार गटाने नव्या चिन्हांची चाचपणी करण्यास देखील सुरुवात केली आहे.

सध्या दोन्ही गटांकडून सुनावणीला सामोर जाण्याची तयारी सुरू असून कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा केली जात आहे. दरम्यान, खरा राष्ट्रवादी पक्ष आपलाच असा दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून करण्यात आला आहे.

आमच्याकडे विधानसभेतील 53 आमदारांपैकी 43 आमदारांचं समर्थन आहे, असा दावा अजित पवार गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. याशिवाय विधानपरिषदेतले 9 पैकी 6 आमदार देखील आमच्या सोबत असल्याचा दावा, अजित पवार गटाकडून केला जात आहे.

दुसरीकडे अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 आमदारांवर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तर अजित पवार गटाकडून देखील शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत येत्या 6 ऑक्टोबरला काय निर्णय होतो, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited by - Satish Daud

Will NCP clock symbol be frozen Ajit Pawar Sharad Pawar Latest Maharashtra Politics Updates
MP Election Survey: मध्य प्रदेशात कोणाची येणार सत्ता, काँग्रेससाठी गोड बातमी; भाजपला किती जागा मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.