OBC Reservation News: तब्बल २१ दिवसानंतर ओबीसींचं उपोषण मागे; देवेंद्र फडणवीसांनी काय आश्वासन दिलं?

OBC Reservation News: तब्बल २१ दिवसांनंतर टोंगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
big breaking ravindra tongue breaks hunger strike in presence of devendra fadnavis obc Reservation news
big breaking ravindra tongue breaks hunger strike in presence of devendra fadnavis obc Reservation newsSaam TV
Published On: 

OBC Reservation Latest News

मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करू नका, ओबीसींच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी करू नका, अशा विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांनी चंद्रपुरात उपोषण सुरू केलं होतं. तब्बल २१ दिवसांपासून टोंगे यांचं उपोषण उपोषण सुरू होतं. आज देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर टोंगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. (Latest Marathi News)

big breaking ravindra tongue breaks hunger strike in presence of devendra fadnavis obc Reservation news
Political News: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची मोठी खेळी; महाराष्ट्रातील ७ आमदारांना खासदारकीचं तिकीट देणार?

राज्य सरकारने मागण्या मान्य केल्याबद्दल ओबीसी संघटनेने राज्य सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, अशी भूमिका मांडत रवींद्र टोंगे यांच्यासह तिघांनी चंद्रपुरात (Chandrapur) अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं. आज या उपोषणाचा २१ वा दिवस होता.

अन्न तसेच पाण्याचा त्याग केल्याने दोन तीन दिवसांपासून टोंगे यांची प्रकृती खालावली होती. राज्य सरकार ओबीसींच्या (OBC Reservation) मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने आता अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार समाजबांधवांनी जाहीर केला होता. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला विविध मागण्यांबाबत आश्वस्त करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

या विनंतीला प्रतिसाद देत रवींद्र टोंगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. फडणवीसांच्या हातून सरबत घेऊन टोंगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. याप्रसंगी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ओबीसी नेते बबनराव तायवाडे उपस्थित होते. दरम्यान, शुक्रवारी ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईत एक बैठक झाली.

यावेळी शिंदे यांनी ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच ओबीसींच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी करणार नाही, असं आश्वासन देखील दिलं. त्याचबरोबर सर्वच मराठ्यांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, असं देखील शिंदे यांनी ओबीसी नेत्यांना सांगितलं. त्यामुळेच आज टोंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले.

Edited by - Satish Daud

big breaking ravindra tongue breaks hunger strike in presence of devendra fadnavis obc Reservation news
MLA disqualification case : ठाकरे गटाची चाल यशस्वी; सुप्रीम कोर्टात धाव घेताच विधानसभा अध्यक्षांचा घाना दौरा रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.