Elections : एकनाथ शिंदेंचा भाजप आणि काँग्रेसला दे धक्का! २ माजी आमदार, २५ नगरसेवक, १०० सरपंचांचा शिवसेनेत प्रवेश

Eknath Shinde Strengthens ShivSena: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दोन माजी आमदारांसह २५ नगरसेवक आणि १०० सरपंचांनी पक्षप्रवेश केला आहे. या मोठ्या प्रवेशामुळे भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Eknath Shinde welcomes former MLAs Shirish Chaudhari and Haribhau Goregaonkar along with 100 local leaders into Shiv Sena at his Mumbai residence.
Eknath Shinde welcomes former MLAs Shirish Chaudhari and Haribhau Goregaonkar along with 100 local leaders into Shiv Sena at his Mumbai residence.Saam Tv
Published On

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ व्हायला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांमध्ये प्रवेश सोहळे देखील वाढले आहेत. भाजपचे संकटमोचक असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्याच बालेकिल्ल्यातील अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी धनुष्यबाण हाती घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेत प्रवेश केला आहे.

Eknath Shinde welcomes former MLAs Shirish Chaudhari and Haribhau Goregaonkar along with 100 local leaders into Shiv Sena at his Mumbai residence.
Court : कोर्टात सरकारी वकिलाला मारहाण! थेट चेंबरमध्ये घुसून बेदम मारलं, बूट फेकून मारला

मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडला. त्यांच्यासोबत 25 नगरसेवक, 100 सरपंचांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची ताकद वाढणार आहे. हा पक्षप्रवेश जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने झाला असल्याचे सांगितले जात आहे.

Eknath Shinde welcomes former MLAs Shirish Chaudhari and Haribhau Goregaonkar along with 100 local leaders into Shiv Sena at his Mumbai residence.
Accident : भीषण! ट्रकखाली चिरडून तरुण इंजिनिअरचा जागीच मृत्यू, घटनेचा CCTV व्हायरल

शिरीष चौधरी हे मूळचे नंदूरबारचे आहे. अपक्ष आमदार म्हणून ते 2014 ला अमळनेरमध्ये निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता आणि यंदाच्या निवडणुकीत अमळनेरची जागा ही अजित पवार गटाला सुटल्याने ते नाराज होते. तसेच स्थानिक नेत्यांकडून कार्यकर्त्यांची कामे केली जात नसल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे चौधरी यांनी सांगितले. तसेच त्यांच्यासोबत अमळनेर, नंदूरबार, तळोदा आणि शहादा येथील 25 ते 30 नगरसेवक आणि 100 सरपंच आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपला मोठे खिंडार पडले आहे.

Eknath Shinde welcomes former MLAs Shirish Chaudhari and Haribhau Goregaonkar along with 100 local leaders into Shiv Sena at his Mumbai residence.
Maharashtra Politics : पुण्यात शरद पवारांना दुहेरी धक्का, दोन दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

हिंगोलीमध्ये काँग्रेसला खिंडार

हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरीभाऊ पाटील गोरेगावकर यांनी देखील आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कांतराव हराळ, माजी शिक्षण सभापती भय्या देशमुख, माजी सभापती बाजीराव जुमडे, माजी उपसभापती मदन इंगोले, डॉ.आर.जी.कावरजे, द्वारकादास सारडा, न्यानोबा कवडे आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तसेच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने स्थानिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या असताना आता अमळनेर आणि हिंगोलीच्या माजी आमदार तथा असंख्य पदाधिकऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार आहे. तसेच महायुतीतील सहकारी पक्ष आणि महाविकास आघाडीला देखील मोठा धक्का बसणार आहे, असे बोलले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com