वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार अजित पवारांच्या भेटीला; भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीत थांबणार? VIDEO

Sangram Jagtap Ajit Pawar Meeting In Mumbai: राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुंबईत भेटण्यासाठी दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप हे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रखर हिंदुत्ववादी विधान करत असल्याने ते चर्चेत आहे. शिव,शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा आपला पक्ष असल्याचे अजित पवार जाहीर सभांमधून सांगत जरी असले तरी संग्राम जगताप हे त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अजित पवारांनी कान टोचल्यावर आजच्या बीडच्या हिंदुत्ववादी मोर्चाला न जाता मुंबईला आले आहे. तसेच जगताप हे भाजपमध्ये जाणार असा दावा देखील रोहित पवार यांनी केला होता. त्यांनंतर आज ही भेट होत आहे. या बैठकीत काय चर्चा होते आता हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com