सर्वात मोठा पक्षप्रवेश! 25,000 कार्यकर्त्यांनी हाती घेतला धनुष्यबाण; एकनाथ शिंदेंचा 'मविआला' हादरा

25000 Workers Join Shinde In Latur Ahmedpur Rally: लातूरच्या अहमदपूरमध्ये झालेल्या भव्य मेळाव्यात २५ हजार कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदेंच्या घोषणांनी आणि आक्रमक भाषणाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
Eknath Shinde addresses a massive rally in Ahmedpur, Latur, as over 25,000 workers join Shiv Sena in a historic political event.
Eknath Shinde addresses a massive rally in Ahmedpur, Latur, as over 25,000 workers join Shiv Sena in a historic political event.saam tv
Published On

संदीप भोसले, साम टीव्ही

लातूर: राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटासह महाविकासआघाडीला मोठा हादरा बसला आहे. एकनाथ शिंदे आगामी काळासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठी ताकद लावत असून, लातूर जिल्ह्यात पक्षाने आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. आज लातूरच्या अहमदपुर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात 25 हजारहून अधिक कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला असून हा आता पर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक पक्षप्रवेश मानला जात आहे. या मेळाव्यातून विरोधकांवर कडाडून टीका करताना आमचा अजेंडा खुर्ची नसून जनतेची सेवा हाच आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Eknath Shinde addresses a massive rally in Ahmedpur, Latur, as over 25,000 workers join Shiv Sena in a historic political event.
Ratnagiri: गावठी बॉम्बच्या स्फोटाने रत्नागिरीत खळबळ, महिलेच्या हाताची पाचही बोटं तुटली

पुढे शिंदे म्हणाले, लातूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी आज 25 हजार जणांनी पक्षात प्रवेश केला. गेल्या 3 वर्षांपासून ही प्रवेशाची मालिका अखंड सुरू आहे. बच्चू कडू यांनीही शिवसेनेत प्रवेश केला असल्याने या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाले. कालच अमित शाह यांच्यासोबत अत्यंत महत्वाची बैठक पार पडली असून त्यानंतर आजचा हा भव्य मेळावा पार पडला.

Eknath Shinde addresses a massive rally in Ahmedpur, Latur, as over 25,000 workers join Shiv Sena in a historic political event.
MLc Election : महायुतीत मोठा भूकंप? भाजप-शिंदेसेनेत ४ जागावरून जुंपली! नक्की काय घडतंय? VIDEO

शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

30 जून पर्यंत 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली. शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासोबतच कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर कालच सविस्तर चर्चा झाली असून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. हा पक्षप्रवेश केवळ राजकीय नसून मराठवाड्याच्या कपाळा वरील दुष्काळाचा शब्द कायमचा पुसून टाकण्यासाठी उचललेले पाऊल आहे, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Eknath Shinde addresses a massive rally in Ahmedpur, Latur, as over 25,000 workers join Shiv Sena in a historic political event.
पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट, सरचार्ज रद्द होणार? बड्या नेत्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील 'डायालॉग' आणि आक्रमक पवित्र्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. ते म्हणाले, विरोधाच्या डोळ्यात जर कचरा गेला असेल, तर त्यांनी अहमदपूरमध्ये येऊन हा जनसागर पाहावा. ही लोकं कोणत्याही लालसेने नव्हे, तर शिवसेनेच्या प्रेमापोटी गोळा झाली आहेत. मराठवाडा असो की संपूर्ण महाराष्ट्र, आज सर्वत्र शिवसेनेला भरभरून प्रेम मिळत आहे. आपल्या प्रसिद्ध स्टाईलमध्ये "एक बार मैंने कमिटमेंट की, फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता," हा डायलॉग मारत, आपण दिलेला शब्द नेहमी पाळतो, हे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com