MLc Election : महायुतीत मोठा भूकंप? भाजप-शिंदेसेनेत ४ जागावरून जुंपली! नक्की काय घडतंय? VIDEO

BJP Vs Shinde Sena MLC Election Seat Sharing Dispute Maharashtra: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत तणाव वाढला असून भाजप आणि शिंदेसेना यांच्यात जागावाटपावरून वाद उफाळला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा महायुतीत तणाव वाढताना दिसतोय. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपावरून मतभेद उफाळून आले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप 12 जागांवर निवडणूक लढण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे शिंदेसेनेनं 7 जागांची मागणी केली आहे. मात्र, भाजपकडून शिंदेसेनेला 3 पेक्षा जास्त जागा देण्यास नकार देण्यात आल्याचं समजतंय. या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाच्या चर्चेत अद्याप एकमत झालेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत दोन्ही पक्ष आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतला हा वाद किती वाढतो आणि शेवटी कोणता फॉर्म्युला ठरतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com