रणजीत माजगावकर
Devendra Fadnavis News : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना आणि भाजपने आगामी लोकसभेच्या निवणडणुकीची तयारी केली आहे. भाजप आणि शिंदे गटाचा या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (Latest Marathi News)
शिंदे गटाला शिवसेना नाव, धनुष्यबाणाच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे . त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी महाराष्ट्रातील ४८ जागा मोदींच्या झोळीत टाका म्हटले आहे. तर आगामी लोकसभेत शिंदे गटाला फक्त ३ जागा मिळणार असल्याने शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या राजकीय वर्तुळातील चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fandavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीस म्हणाले, 'भाजप आणि शिंदे गटाचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला आहे. आम्ही योग्य वेळी जाहीर करू. अमित शहा यांनी एनडीएतून खासदार निवडून येतील हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोंधळ निर्माण करू नका'.
दरम्यान, ठाकरे गटाने 'सामना'तील अग्रलेखातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार आगपाखड केली. 'अमित शहा हे महाराष्ट्र व मराठी माणसांचे क्रमांक एकचे शत्रू आहे, असं म्हणत ठाकरे गटाने अमित शहांवर घणाघात केला होता. ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'उद्धव ठाकरे हे अमित शहा यांना शत्रू मानत असतील, पण आम्ही कोणाला शत्रू मानत नाही. आम्ही वैचारिक विरोधम मानतो'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.