Maharashtra Politics : एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष पेटला; ठाकरे गटाच्या 'या' याचिकेवर उद्या सुनावणी होणार

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे संघर्ष आणखी पेटला आहे.
Eknath shinde Vs uddhav thackeray
Eknath shinde Vs uddhav thackeray Saam TV

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गट आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने सदर प्रकरण मेन्शन केल्यानंतर उद्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला दिलं. आयोगाच्या निर्णयामुळे शिंदे गटात आनंदाचं वातावरण असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटात नाराजी पसरली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती.

Eknath shinde Vs uddhav thackeray
Maharashtra Politics : 'अमित शहा मराठी माणसांचे क्रमांक एकचे शत्रू'; 'कमळी' म्हणत ठाकरे गटाची भाजपवर आगपाखड

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गट निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण मेन्शन करण्याची शक्यता आहे. न्यायालयाने ठाकरे गटाला प्रकरण मेन्शन करण्यास सांगितले आहे. त्यानंतर यावर विचार करू, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

Eknath shinde Vs uddhav thackeray
Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; नाशिकपाठोपाठ ठाण्यातही गुन्हा दाखल, शिवसैनिक आक्रमक

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर तातडीने स्टे-ऑर्डर आणण्यासाठी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील याबाबत सावध भूमिका घेतली असून ठाकरे गटाने याचिका दाखल करण्यापूर्वीच त्यांनी कोर्टात ‘कॅव्हेट’ दाखल केले आहेत.

शिंदे गटाने या अगोदरच त्यांचे म्हणणं ऐकूण घेतल्याशिवाय निवडणूक आयोगासंदर्भात कोणताही निर्णय देऊ नये, असं कॅव्हेट सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com