Youth Dies: पोहायला गेला अन् पाण्यातच दम लागला, श्वास कोंडल्यानं जागीच जीव सोडला; आई-बापानं..

Tragedy in Jalgaon:मेहरूण तलाव परिसरात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. मोहम्मद नदीम शेख (वय अंदाजे २० वर्षे) या युवकाचा पोहत असताना दम लागून पाण्यात बुडून मृत्यू झाला.
drowns
drownsSaam Tv News
Published On

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात एक ह्रदयद्रावक घटना घडली. एका २० वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. युवक आपल्या काही मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पोहताना युवकाला दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. त्याचे मित्र त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, मात्र त्यांना यश आले नाही. या घटनेनंतर परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.

मोहम्मद नदीम शेख (वय अंदाजे २० वर्षे) असे मृत तरूणाचे नाव आहे. नदीम आपल्या काही मित्रांसोबत मेहरूण तलावात गेला होता. प्राथमिक माहितीनुसार, पोहत असताना नदीमला दम लागला आणि तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी नदीमला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.

drowns
Pune Traffic: नेमून दिलं तिथे गेलेच नाही, दुसऱ्या चौकात जाऊन वसुली; पुण्यात ३ वाहतूक पोलीस सस्पेंड

तो पाण्यात बुडाला आणि त्याचा पाण्यातच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नदीमच्या कुटुंबानेही तलाव परिसरात धाव घेतली. त्याचा मृतदेह तलावातून बाहेर काढले असून, शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर कुटुंबासह परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.

drowns
Sharad Pawar: राज ठाकरेंवर पवारांची थेट टीका; म्हणाले, सभांना गर्दी असते, पण मतं मिळत नाहीत

विसापूरमध्ये जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी, १० जण जखमी

येवला तालुक्यातील विसापूर गावात रविवारी दुपारच्या सुमारास जमिनीच्या वादातून दोन गटांत भीषण हाणामारी झाली. या झटापटीत १० जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com